Maharashtra Rain Alert : यंदा मे महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतरचे पुढचे तीन महिनेही म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. पण मान्सूनच्या शेवटच्या सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज होता. पण सप्टेंबरमध्ये पावसाने विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण केली. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अशातच ऑक्टोबर महिन्याची सुरवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी वर्तवला होता. परंतु,आताच्या ताज्या रिपोर्टनुसार, राज्यात 15 ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके पाऊस,वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी, अशा सूचना सरकारने शेतकऱ्यांना दिल्या आहेत.
राज्यात कुठे कुठे पडणार पाऊस?
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडं असल्याचं पाहायला मिळालं. नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं.मात्र,15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. पाऊस पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपून काढू शकतो. येथील अनेक भागात ढगाळ हवामान किंवा वादळी पावसाची शक्यता राहील. तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या जोरदार सरी बरसू शकतात.
नक्की वाचा >> Viral : माजी पंतप्रधानांचा किसिंग सीन व्हायरल! यॉटवर सिंगर कॅटी पेरीसोबत झाले रोमॅन्टिक, जगभरात उडाली खळबळ!
मुंबई, पुणे, मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाऊस माघार घेईल,असा अंदाज होता. मुंबईतून पावसाने निरोप घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं होतं. दसऱ्यापर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पावासाच्या सरी कोसळल्या होत्या. 5 किंवा 6 ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या प्रवासाला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 तारखेला महाराष्ट्रात शक्ती चक्री वादळ घोंगावणार असल्याची माहिती समोर आली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वादळाच्या संभाव्य परिणामांबाबत जिल्हा स्तरावर अतिदक्षतेचा इशाराही दिला होता.
नक्की वाचा >> धनत्रयोदशीपूर्वी सूर्य-मंगळची होणार युती,'या'4 राशीच्या लोकांवर होणार लक्ष्मी-कुबेरची कृपा, मिळणार बक्कळ पैसा