सुरज कसबे, प्रतिनिधी:
Mumbai Pune Old Highway Traffic: मुंबई- पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडीने वाहन चालकांना चांगलेच हैराण केले आहे. मुंबई पुणे महामार्गावर वारंवार ट्रॅफिकचा प्रश्न उद्भावत आहे. अशातच आता जुन्या मुंबई- पुणे हायवेवरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर असलेल्या मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये आज सकाळी एक कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
मुंबई- पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर असलेल्या मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये आज सकाळी एक कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. ग्रेड सेपरेटरमधील बोगद्याची उंची कमी असतानाही चालकाने कंटेनर आत नेल्याने हा प्रकार घडला.
Actress Arrested: ग्लॅमरच्या आड काळा धंदा! सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमधून जात असताना बोगद्याच्या छताला घासून मध्यभागी अडकला. बोगद्याची उंची आणि कंटेनरची उंची यांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेनंतर ग्रेड सेपरेटरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कंटेनर काढण्याचे काम सुरु
पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने कंटेनर बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.अडकलेला कंटेनर काढण्याचे काम अद्याप सुरू असले, तरी विस्कळीत झालेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या या मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू आहे. दरम्यान ग्रेड सेपरेटरमधून अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही असे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाका ते अमृतांजन ब्रिज पर्यंत दोन्ही लेनवर वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात पुणे लेनवर अमृतांजन ब्रिज ते दत्त वाडीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. तर मिसिंग लेन स्टार्टींग पॉईंट ते खालापूर टोल नाकापर्यंत मुंबई लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचे कारण कळू शकले नाही.
Solapur Politics: सोलापुरात भाजपला मोठा धक्का; भाजप जिल्हाध्यक्षांचं ZP सदस्यत्व रद्द करावे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world