ठाकरे गटाला धक्का! राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा, स्थगितीस कोर्टाचा नकार

बहुप्रतिक्षित असलेल्या राज्यपालनियुक्त (Governor appointed MLA) 12 आमदारांच्या यादीतील 7 आमदारांची नावे अखेर जाहीर झाली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

बहुप्रतिक्षित असलेल्या राज्यपालनियुक्त (Governor appointed MLA) 12 आमदारांच्या यादीतील 7 आमदारांची नावे अखेर जाहीर झाली आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी (Maharashtra Politics) पाठवलेल्या सात नावांची शिफारस राज्यपालांनी मान्य केली आहे. आज दुपारी सेंट्रल हॉल येथे या सात आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. 

यावर आक्षेप घेत ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आणि तातडीने शपथविधी रोखण्याची मागणी केली होती. याचिकाकर्ते सुनील मोदी यांच्या वकिलांनी सात आमदारांची आज नियुक्ती होत असल्याची माहिती न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांना दिली. सरकारी वकिलांनी यावर सध्या राज्यपालांच्या निर्णयावर आपण कोणतीही भूमिका घेऊ शकत नसल्याचे सांगितले.  यावेळी न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांनी मी आज तातडीने निर्णय देऊ शकत नाही. मात्र येणाऱ्या निर्णयात दिलेल्या माहितीचा मी विचार करेन असे सांगितले. त्यामुळे आज राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी होणार हे निश्चित झाले आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

नक्की वाचा - Big News : राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं जाहीर, आजच होणार शपथविधी 

सात आमदारांची यादी संविधान बाह्य - संजय राऊत
हे सरकार घटनाबाह्य आहे. यावरील याचिका आणि निकाल प्रलंबित आहे. अद्याप निकाल आला नाही. तरीही निवडणुकीच्या आधी विविध जाती धर्माच्या सदस्यांना शपथ देताय. हे घटनाबाह्य काम केलंय. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यपालांच्या द्वारे हे काम केलं आहे.  आम्ही पाठवलेल्या यादीला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय दिला आहे. सात विधान परिषद आमदार नियुक्ती विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. पहिली यादी प्रलंबित असताना दुसरी यादी कशी काय मान्य करताय. हे आमच्यासाठी धक्कादायक आहे.