जाहिरात

Big News : राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं जाहीर, आजच होणार शपथविधी 

बहुप्रतिक्षित असलेल्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या यादीतील 7 आमदारांची नावे अखेर जाहीर झाली आहेत.

Big News : राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं जाहीर, आजच होणार शपथविधी 
मुंबई:

बहुप्रतिक्षित असलेल्या राज्यपालनियुक्त (Governor appointed MLA) 12 आमदारांच्या यादीतील 7 आमदारांची नावे अखेर जाहीर झाली आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी (Maharashtra Politics) पाठवलेल्या सात नावांची शिफारस राज्यपालांनी मान्य केली आहे. आज दुपारी 12  वाजता सेंट्रल हॉल येथे या सात आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. 

राज्यपालनियुक्त सात आमदारांची यादी 
1. चित्रा वाघ 

2. विक्रांत पाटील
3. धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड
4. पंकज भुजबळ 
5. इद्रीस नायकवाडी 
6. हेमंत पाटील
7. मनीषा कायंदे 

बहुप्रतिक्षित 12 राज्यपालनियुक्त आमदारांपैकी सात आमदारांची नावे अखेर जाहीर झाली आहेत. भाजपाकडून तीन, तर शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला दोन दोन जागा मिळाल्या आहेत. 12 पैकी 7 आमदारांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्‍यांकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. सामाजिक, कला या क्षेत्रात काम करणाऱ्यांना या 12 जागी संधी मिळावी अशी धारणा असतानाही निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या नियुक्त्या याजागी करण्यात आल्या आहेत. 

Election Commission : विधानसभेचं वारं तापणार! आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा, आचारसंहिताही लागू होणार

नक्की वाचा - Election Commission : विधानसभेचं वारं तापणार! आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा, आचारसंहिताही लागू होणार

कोणत्या सात नावांना संधी 

1 भाजपाकडून महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली आहे. महिलांच्या प्रश्नी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्या अशी त्यांची ओळख आहे. 
2. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांना संधी मिळाली आहे. कोकणात भाजपाचं बळ वाढवण्याची रणनीती यामागे दिसते. 
3. ⁠बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या गादीचे गुरू बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपनं आमदारकी दिली आहे. बंजारा समाजाचा निवडणुकीत लाभ व्हावा आणि विदर्भातील ताकद वाढवण्यासाठी हे नाव महत्त्वाचं आहे.
4. छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना अजित पवारांकडून संधी देण्यात आली आहे. नांदगावमधून ते दोन वेळा विधानसभेवर गेले आहेत. या निमित्तानं नांदगाव मतदारसंघावरुन महायुतीत सुरू झालेला वाद संपण्याची चिन्हं आहेत. 
5. ⁠सांगलीचे माजी महापौर इदेरिस नायकवडी यांना अजित पवारांनी संधा दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मुस्लीम चेहरा असं समीकरण जुळवण्यात आलं आहे. 
6. शिंदे शिवसेनेकडून हिॅगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांना संधी मिळाली आहे. पाटील यांचे तिकीट लोकसभेला कापण्यात आले होते. पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून लढवण्यात आलं होतं. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
7. मुंबईचा विचार करता मनिषा कायंदे यांना संधी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून कायंदे या शिंदे सेनेत आल्या आणि प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. ठाकरेंच्या सेनेविरोधात कायंदेंना बळ देण्यात आल्याचं मानण्यात येत आहे. 
 

Previous Article
महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजप किती जागा लढणार? शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर बातमी
Big News : राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं जाहीर, आजच होणार शपथविधी 
election commission press conference today will announce dates of assembly elections in Maharashtra
Next Article
Election Commission : विधानसभेचं वारं तापणार! आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा, आचारसंहिताही लागू होणार