जाहिरात

VIDEO: सावधान! हायटेक कार चोरांची टोळी सक्रिय.. फक्त 15 मिनिटात गाडी गायब, हातचलाखी CCTVत कैद

उस्मानपुरा परिसरातून रात्रीच्या वेळी अवघ्या अर्ध्या तासात सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या दोन कार चोरून नेण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

VIDEO: सावधान! हायटेक कार चोरांची टोळी सक्रिय.. फक्त 15 मिनिटात गाडी गायब,  हातचलाखी CCTVत कैद

Chhatrapati Sambhajinagar Car Theft CCTV Footage:  तुम्हीही घराबाहेर कार पार्क करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना ऐकल्या असतील. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या वाढत्या कार चोरीच्या घटनांनी पोलिसांचेही टेन्शन वाढवले आहे. सहा दिवसात दुसऱ्यांदा शहरामध्ये कार चोरीची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कार चोरीची आधुनिक टेक्निक..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर हायटेक पद्धतीने कार चोरी करणाऱ्या टोळीने थेट पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अवघ्या सहा दिवसांत दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. न्यू श्रेयनगर आणि उस्मानपुरा परिसरातून रात्रीच्या वेळी अवघ्या अर्ध्या तासात सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या दोन कार चोरून नेण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kalyan Shocking News: गर्दीचा थरार की विकृती? कल्याण स्टेशनवर डब्यात चढताना महिलेसोबत भयंकर घडलं...

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल 

विशेष म्हणजे हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. न्यू श्रेयनगर येथील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर तिवारी यांनी २०२३ साली Tata Harrier ही कार खरेदी केली होती. घरासमोर पार्किंगची सोय नसल्याने ते आपली कार मित्र व नगरसेवक राजू वैद्य यांच्या घरासमोर उभी करत होते. नेहमीप्रमाणे रात्री कार पार्क करून ते घरी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून अत्याधुनिक पद्धतीने सिस्टम हॅक करत कार पळवली.

हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरटे अत्यंत सफाईदार पद्धतीने काही मिनिटांत कार उघडून ती घेऊन जाताना दिसत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com