Hindi Language Controversy : '7 जुलैला आझाद मैदानावर आंदोलन, हिंदींचा विरोध नाही मात्र सक्ती नको'; उद्धव ठाकरे मैदानात उतरले

आज उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्य सरकारच्या शालेय अभ्यासक्रमातील हिंदी भाषेच्या (Hindi Language Controversy) सक्तीविरोधात राज्यभरात वादंग सुरू आहे. अगदी विरोधकांपासून मराठी अभ्यास आणि सिनेक्षेत्रातूनही हिंदी भाषा सक्तीचा विरोध केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात आज उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मातृभाषा लढ्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. कारण नसताना हिंदी सक्ती महर्षी द्रोही सरकारकडून लादली जात आहे. पक्षीय भेदभेद विसरून मराठीसाठी आह्वान करत आहोत. शिवसेना यांना का संपवायची आहे हे लक्षात आलं असेल, असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान दीपक पवार म्हणाले,  शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचे पदाधिकारी काल उद्धव ठाकरे यांना भेटलो. येत्या रविवारी 29 जूनला जाहीर सभा घेत आहोत. यासाठी 7 जुलै रोजी धरणे आंदोलन करणार आहोत. हुतात्मा स्मारक ते आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत. हुतात्म्यांना अभिवादन करणार असल्याचं ते म्हणाले. 

Advertisement

नक्की वाचा - Hindi Language Maharashtra Controversy: हिंदी सक्तीविरोधात 6 जुलैला भव्य मोर्चा काढणार; राज ठाकरेंची घोषणा

याला जोड देत उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदी भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. हिंदी चित्रपट सृष्टीला जोपासलं ते महाराष्ट्राने केलं. मुंबईत येऊन सगळे अभिनेते अभिनेत्री मोठ्या झाल्या. वावड नाही पण कालांतराने एक निशाण एक विधान असून राज्य सरकारचा एकाधिकार शाहीकडे वाटचाल सुरू आहे. भाषिक आणीबाणी आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणार आहोत. शिवसेनेतील गद्दार तिकडे राहत आहेत त्यांना बाळासाहेब यांचे विचार पुन्हा सांगायची गरज आहे. हिंदी कोणाला येत नाही असं नाही. काही दिवसांपूर्वी आरएसएसचे जोशी घाटकोपरला मुक्ताफळं उधळून गेले होते.  मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेची सक्ती करावी लागली होती. कारण हे मराठी नामशेष करायला निघाले होते.

भाजपतील अस्सल मराठी प्रेमी यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आझाद मैदानात शिक्षण अधिकाऱ्यांना भेटणार आहोत, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world