
समाधान कांबळे, हिंगोली: राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागल्याचे पाहायला मिळत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. अशातच आता हिंगोलीमध्येही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंगोलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला असून सेनगाव नगरपंचायतच्या आजी माजी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात होणार पक्षप्रवेश होणार आहे. 8 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सेनगाव येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी शरद पवारांच्या पक्षाला खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे.
हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील महत्त्वाचे नेते आणि अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. यामध्ये सेनगाव नगरपंचायतचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आजी-माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सदस्य आणि सरपंच यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी शरद ॉचंद्र पवार गटाची साथ सोडून अजित पवारांची घड्याळ हाताला बांधणार आहेत.
या पक्षप्रवेशामुळे हिंगोलीतील राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.. शरदचंद्र पवार यांचे खंदे समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होणार आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या 8 जून रोजी सेनगाव येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
Pune Crime: माझ्या लग्नाला का आला नाही म्हणत मारहाण, जीवे मारण्याची धमकी, 5 अटकेत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world