जाहिरात

Pune News: लग्नाच्या वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला, नवरा बायकोला घेवून पळाला

या घटनेत एक लहान मुलासह 19 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Pune News: लग्नाच्या वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला,  नवरा बायकोला घेवून पळाला
पुणे:

जुन्नर तालुक्यातील एका गावात लग्न होतं. दोन्ही कडची वऱ्हाडी मंडळी लग्नासाठी मांडवात जमले होते. लग्नाचा आनंद दिसत होता. सर्व जण नटूनथटून लग्नात सहभागी झाले होते. पण त्याच वेळी अचानाक या मांडवात असलेल्या वऱ्हाडींवर मधमाशांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. वऱ्हाडी लग्न सोडून स्वताचा बचाव करण्यासाठी धावाधाव करू लागले. बघता बघता संपूर्ण मंडप रिकामा झाला. वऱ्हाडी पळत असताना नवरा आणि नवरी ही बावरले होते. मग काय नवऱ्याने मागे पुढे न पाहाता बयकोचा हात पकडून त्यानेही मंडपातून धूम ठोकत आपला बचाव केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या घटनेत एक लहान मुलासह 19 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत इतर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे ते वाचले. पण या घटनेनं सर्वांचीच तारांबळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात या आधी काही लोकांना जीवही गमवाला लागला होता. त्यामुळे तर गावकरी आधीच घाबरले होते. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

सर्व काही ठिक चाललं असताना या मधमाशा मांडवात कशा काय घुसल्या. त्यांच्या मधाच्या पोळ्यावर कुठी दगड मारला किंवा त्यांना तिथून कुणी उठवलं का याची माहिती मात्र स्पष्ट झाली नाही. पण मधाच्या पोळ्याच्या बाजूला काही तरी हालचाल झाल्याचे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जुन्नर तालुक्यात गेल्या काही महिन्यात असेच मधमाशांचे हल्ले झाले आहेत. त्यात आता आणखी एका हल्ल्याची भर पडली आहे. यानंतर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com