Amravati Politics : दर्यापूर मतदारसंघात कोण जिंकणार आधीच आलं समोर; अंकशास्त्रतज्ञाचा मोठा दावा

महायुतीकडून अभिजीत अडसूळ यांचं नाव चर्चेत आहे. तर नवनीत राणांकडूनही या मतदारसंघात मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच पनपालिया यांनी दर्यापुरात अपक्ष उमेदवार निवडून येणार असा दावा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'महायुती व महाविकास आघाडी' यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र आता जवळजवळ स्पष्ट झालेल आहे. असं असतानाच अमरावतीच्या दर्यापुरात महायुती व आघाडीच्या विरोधात दर्यापूरकर मतदारांचा कौल कुणाला मिळणार असल्याचा मोठा अंदाज अंकशास्त्रतज्ञाने वर्तविला आहे. यामुळे युती व आघाडीतील उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात चांगली खळबळ देखील माजली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाजी मारणार, असे मोठे भाकीत अंकशास्त्रतज्ञ योगेश पनपालिया यांनी आपल्या कामधेनू मशीनद्वारे वर्तवले आहे. त्यांच्या या भाकितामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं टेन्शन वाढणार आहे.  अमरावतीच्या दर्यापुरात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट लढत होण्याचे संकेत आहेत. 

(नक्की वाचा-  "राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत", जागावाटपावरुन संजय राऊतांची तिखट टीका)

महायुतीकडून अभिजीत अडसूळ यांचं नाव चर्चेत आहे. तर नवनीत राणांकडूनही या मतदारसंघात मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच पनपालिया यांनी दर्यापुरात अपक्ष उमेदवार निवडून येणार असा दावा केला आहे. विशेष म्हणजे लोकसभेत नवनीत राणा व बळवंत वानखडे यांच्यामध्ये मोठी लढत झाली होती. नवनीत राणा पुन्हा लोकसभेत जातील, असं चित्र स्पष्ट असतानाच निवडणुकीपूर्वी बळवंत वानखडे हेच निवडून येतील, असं भाकीत पणपालिया यांनी वर्तवल होतं.

(नक्की वाचा -  तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता)

पुढे, नवनीत राणांचा धक्कादायक पराभव करून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे लोकसभेत विजयी झाले आणि योगेश पनपालिया यांनी अंकशास्त्राच्या जोरावर वर्तवलेल ते भाकीत खरं ठरलं. त्याच पनपालीया यांनी आता दर्यापूर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार निवडून येईल असं भाकीत केलंय. त्यांच्या या भाकितामुळे महायुती व महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.

Advertisement

कोण आहेत योगेश पनपालिया? 

योगेश पणपालीया मूळचे दर्यापूर येथील आहेत. अंकशास्त्र या विषयात त्यांचा हातखंड आहे. दर्यापूर येथील एका शाळेत शिक्षण झाल्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत याच पनपालिया यांनी नवनीत राणांच्या विरोधात कौल दिला होता. महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे निवडून येतील, असं भाकीत त्यांनी वर्तविल होतं. जे पुढे तंतोतंत खरे ठरल्यानंतर पणपालीया हे पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

Topics mentioned in this article