महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत बैठकांवर बैठका सुरु आहे. महायुतीचा जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अद्याप महाविकास आघाडीच्या पक्षांचं एकमत होताना दिसत नाहीय. जागावाटपात होत असलेल्या दिरंगाईवरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
(नक्की वाचा - तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता)
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये राज्यातील विधानसभेच्या 288 पैकी 200 जागांवर सहमती झाली आहे. जागावाटपाबाबत काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक तसेच महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत शुक्रवारी बातचित झाली आहे. हे सर्व नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती देखील संजय राऊत दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय राऊत यांनी पुढे म्हटलं की, जागावाटपाबाबतचा लांबलेला निर्णय लवकरच घेतला पाहिजे. विधानसभा निवडणुकीसाठी कमी वेळ शिल्लक आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. त्यांना पुन्हा-पुन्हा यादी दिल्लीला पाठवावी लागत आहे. त्यानंतर पुन्हा चर्चा करावी लागत आहे. जागावाटपाची चर्चा लवकर संपवणे गरजेचं आहे.
(नक्की वाचा- मुख्यमंत्रिपदासाठी पवारांची पहिली पसंती कोण? थेट संकेत दिले, 'त्या' नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार?)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत म्हटलं की, 20-25 जागा अशा आहेत, जिथे महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नाही. या जागांवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पक्षांचे वरिष्ठ नेत्यांमध्ये आता चर्चा होईल. येत्या दोन दिवसात सर्व जागावाटपाची घोषणा केली जाईल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world