
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला मुंबई आणि पाकिस्तानमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. भारताने पाकिस्तानकडून आलेला प्रत्येक हल्ला परतवून लावला आहे. मात्र पुढील काही दिवसात हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील 30 हून अधिक विमानतळदेखील बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणांवरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सुरक्षा कारणास्तव यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. येथील धरण परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. धरणावर यंत्रसामग्री आणि सायरन बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्ती व वाहनांना धरणावर प्रवेश दिला जाणार नसल्याचीही माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा - Pune Crime : पाकिस्तान समर्थनार्थ पोस्टमुळे पुण्यातील विद्यार्थिनीला अटक, आता सिंहगड महाविद्यालयाकडूनही मोठी कारवाई
पाकिस्तानचा 36 ठिकाणी 400 वेळा ड्रोनने घुसण्याचा केला प्रयत्न
पाकिस्तानने भारतात 36 ठिकाणी 400 वेळा ड्रोनने घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. पाकिस्ताननं एलओसीचं अनेकवेळा उल्लंघन केलं. भारताच्या हद्दीतील माहिती मिळवण्यासाठी ड्रोन पाठवले होते. तुर्कीतले असेसगार्ड ड्रोन असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशी माहिती ही देण्यात आली. उरी, पूंछ, मेंढक अखनूर या भागात पाकिस्तानने घुसखोरी केली. पाकिस्तान आपल्या नागरी एअरलाईन्सचा उपयोग ढाल म्हणून उपयोग करत आहे. असं ही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world