जाहिरात

Mumbai to Konkan : कोकणवासियांसाठी चांगली बातमी! आता दररोज करता येणार मुंबई ते कोकण प्रवास; मोठी घोषणा

नव्या एक्स्प्रेस ट्रेनमुळे पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक उद्देशांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Mumbai to Konkan : कोकणवासियांसाठी चांगली बातमी! आता दररोज करता येणार मुंबई ते कोकण प्रवास; मोठी घोषणा
AI Image

New regular express train on Konkan Railway route : भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवासी कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी, भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या नवीन सेवेमुळे ५१० किलोमीटरच्या मार्गावर थेट, सोयीस्कर आणि विश्वसनीय रेल्वे जोडणी उपलब्ध होईल, ज्यामुळे पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक उद्देशांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

प्रस्तावित रेल्वेगाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावांनी दररोज धावेल. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. 

नक्की वाचा -  रात्रीची वेळ...नदीचं रौद्र रुप, अंदाज चुकला अन्...; वेदांतने कशी दिली मृत्यूला हुलकावणी?

नवीन दैनिक एक्सप्रेसचे थांबे 

दादर, ठाणे, पनवेल, पण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड , वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड 

कोकणातील पर्यटनस्थळांना मोठा फायदा

या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांमध्ये अखंड रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या नव्या सेवेचा मोठा फायदा कोकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळांना होणार आहे. समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. तसेच विद्यार्थी, व्यापारी, नोकरी करणारे आणि दैनंदिन प्रवाशांसाठीही ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रादेशिक विकासाला गती या ट्रेनमुळे मिळणार असून कोकण विभागातील आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रवास सुलभ होऊन लोकांची ये-जा वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना देखील फायदा होणार आहे. कोकण मार्गावरील वाढती प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या दैनिक एक्स्प्रेसमुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com