कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Kokan heavy rain) कोकण रेल्वेचे हाल सुरू आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यानंतर रविवारी 14 जुलै रोजी खेड-दिवाण खवटी दरम्यान रेल्वे रूळावर दरड कोसळली. यानंतर कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. 14 तासांनंतरही कोकण रेल्वेची (Kokan Railway not working) वाहतूक ठप्पच आहे. रुळावरील दरड हटविण्याचं काम सुरूच आहे.
वाहतूक ठप्प असल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. काही गाड्या कालपासून रेल्वे स्थानकात थांबून ठेवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,
रद्द करण्यात आलेल्या गाड्या...
दिवा-रत्नागिरी गाडी रद्द
इतर मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या
पाटणा - वास्को द गामा एक्स्प्रेस ही जिते येथून माघारी घेऊन ती कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा-मडगाव मार्गे वळविण्यात आली
लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस ही गाडी रोहा येथून माघारी घेऊन ती कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर मार्गे वळविण्यात आली आहे
गांधीधाम- नगरकोइल जंक्शन एक्स्प्रेस ही विन्हेरे येथून माघारी घेऊन कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे
हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम एक्स्प्रेस काल माणगाव येथे होती, ती गाडी माघारी घेऊन कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू मार्गे वळविण्यात आली आहे
लोकमान्य टिळक -तिरूवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस करंजाडी येथे होती, ती गाडी माघारी घेऊन कल्याण लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन - एर्नाकुलम मार्गे वळविण्यात आली आहे.
नक्की वाचा - Konkan Rain : कोकणाला मुसळधार पावसाने झोडपलं; अनेक नद्यांना पूर, रस्ते वाहतुकीवर परिणाम
गाड्यांच्या वेळेत बदल
काल रात्री 9.54 सुटणारी मुंबई सीएसएमटी- मंगळुरु जं. एक्सप्रेस रात्री 2 वाजता सोडण्यात आली आहे.
रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल
रेल्वे स्थानकात थांबून असलेल्या गाड्या
मडगाव जं. - मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस ही काल सायंकाळपासून खेड येथे थांबून
सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेस ही काल सायंकाळपासून दिवाणखावटी येथे थांबून
मडगाव जं. - मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी येथे काल सायंकाळपासून थांबून
मडगाव जं. - मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस ही देखील काल सायंकाळपासून रत्नागिरी स्थानकात थांबून
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world