जाहिरात

October Health Tips: दिवसा ऊन, रात्री गारवा! ऑक्टोबर हिटमुळे आजार वाढले; कशी घ्याल काळजी?

या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आणि डोकेदुखीसारख्या संसर्गजन्य (Infectious) आजारांनी घेरले आहे.

October Health Tips: दिवसा ऊन, रात्री गारवा! ऑक्टोबर हिटमुळे आजार वाढले; कशी घ्याल काळजी?

गुरु दळवी, सिंधुदुर्ग

October Heat and Viral Infections: पावसाळा संपल्यानंतर आता पुणे जिल्ह्यासह (Pune District) संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने (October Heat) चांगलाच जोर धरला आहे. दिवसा कडक ऊन (Scorching Sun), तर रात्री अचानक गारठा (Chill) जाणवत असल्यामुळे वातावरणात तीव्र चढ-उतार (Drastic Climate Changes) होत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आणि डोकेदुखीसारख्या संसर्गजन्य (Infectious) आजारांनी घेरले आहे.

ऑक्टोबर हिटमुळे आजार वाढले

 सध्या दिवाळीच्या (Diwali) खरेदी निमित्ताने बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग (Infection) होऊन रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे, सध्या दवाखान्यांमध्येही (Hospitals) रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी (Precaution) घेण्याचा सल्ला दिला आहे.

Accident News: अमरावतीत हिट अँड रनचा थरार, भरधावकारने दोन तरुणींना उडवलं

ऑक्टोबर हिटचा परिणाम नेमका काय? सध्या वातावरणात अचानक बदल होत आहे. दिवसा कडक ऊन जाणवते, तर संध्याकाळनंतर हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होते. रात्री थंडीचा कडाका जाणवतो आणि पहाटे थंडीची तीव्रता अधिक असते, काही प्रमाणात धुकेही (Fog) पडते. मात्र, सूर्योदयानंतर लगेचच उन्हाचा कडाका जाणवतो आणि दिवसभर ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम असतो. वातावरणातील याच तीव्र चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

आरोग्याची कशी घ्याल काळजी? 

या बदलत्या हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

  • शक्यतो फ्रीजमधील पाणी पिणे आणि आईस्क्रीम खाणे टाळावे.

  • पाणी उकळून प्यावे.

  • बाहेरील तळलेले पदार्थ (Fried Food) खाणे टाळावे.

  • उन्हात फिरताना नाक आणि तोंडाला रुमाल बांधावा.

  • बाहेर फिरताना काळजी घ्यावी आणि दुचाकीवरून प्रवास करताना नाक-तोंडाला रुमाल लावावा.

डॉक्टरांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचा बचाव करावा.

Nashik News : एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याकडून वृद्ध महिलेचं अपहरण; दोघांच्या मदतीने रचला धक्कादायक प्लान

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com