संकेत कुलकर्णी, पंढरपूर
आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री करत असतात, अशी परंपरा आहे. मात्र उद्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते होऊ शकते. याबाबतचा निर्णय आज दुपारपर्यंत होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री करतात. मात्र सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने उपमुख्यमंत्री शासकीय महापूजा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत विधी व न्याय विभागाकडून मंदिर समितीस आज दुपारपर्यंत महापूजेबाबत आदेश प्राप्त होणार आहेत.
ट्रेंडिंग बातमी - शहाजी बापूंच्या गडात उद्धव ठाकरेंचं 'काय झाडी काय डोंगर' सभा गाजवली
मात्र यामध्ये राज्याच्या मुख्य सचिवा सुजाता सैनिक किंवा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना कार्तिकी एकादशीच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा बहुमान मिळणार आहे. उद्या पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरू होईल. आणि यानंतर पंढरपुरातील कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सुरुवात होणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'अमित शाह म्हणजे मुन्ना भाई MBBS मधले...' ठाकरेंनी खडे-खडे सुनावले
यापूर्वीही कार्तिकी एकादशीच्या काळामध्ये निवडणुका आल्या होत्या. आचारसंहितेच्या कारणास्तव त्यावेळीही राज्याच्या मुख्य सचिवांनी पूजा केली होती. स्वाधीन क्षत्रिय हे मुख्य सचिव असताना त्यांनी एकादशीची महापूजा केली होती. तसेच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील काही वेळा कार्तिकी एकादशीची महापूजा केली असल्याचा इतिहास सांगितला जातो.