शहाजी बापू पाटील यांच्या गडात आज रविवारी उद्धव ठाकरे यांनी सभा गाजवली. यावेळी त्यांनी शहाजी बापूंना झोडून काढले. भाषणाची सुरूवातच उद्धव ठाकरे यांनी काय झाडी काय डोंगर अशा पद्धतीने केली. शिवाय 23 तारखेचं एक तिकीट हवं आहे. कोणी काढून देईल का. तेही गुवाहाटीचं असं, उद्धव ठाकरे म्हणाले. इथल्या गद्दाराला कायमचं गुवाहाटीला पाठवायचं आहे. मग बस तिकडे झाडी आणि डोंगर मोजत असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सांगोल्याच्या सभेत केला. सांगोला विधानसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे यांनी दिपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी ते आले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुवाहाटीला गेल्यानंतर काय झाडी काय डोंगर यामुळे शहाजी बापू पाटील हे महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले होते. तोच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापूंवर जोरदार हल्ला चढवला. काय झाली काय डोंगर बोलणाऱ्या गद्दाराला त्याची जागा दाखवायची आहे असं ठाकरे म्हणाले. शिवाय रेल्वेमध्ये तुमचं कोणी ओळखीचं आहे का? ओळखीचं असेल तर मला एक तिकीट काढून हवं आहे. ते तिकीट गुवाहाटीचं आहे. असं म्हणत 23 तारखेला हे तिकीट काय झाली काय डोंगार वाल्यांना द्यायचं आहे. तिकडे कायमचे जा आणि झाडं डोंगर मोजत बसा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'मी काय म्हातारा झालोय का? 84 वर्षाचे शरद पवार असं का म्हणाले?
देव प्रत्येकाला संधी देत असतो. त्या संधीचं काही जण सोनं करतात. तर काही जण माती करतात. इथल्या गद्दाराने तर मातेरं करून घेतलं आहे. त्यांना किता माज होता. तोच माज उतरवण्यासाठी मी आलो आहे. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं तेच तुमचा माज उतरवणार. त्यामुळे या गद्दाराला गाडायला मी आलो आहे. त्याच्या छाताडावर बसून भगवा रोवणार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तो गद्दार झाला म्हणजे सर्व गद्दार झाले असं होत नाही. सर्व शिवसैनिक आपल्या बरोबर असल्याचा दावाही यावेळी ठाकरे यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - आक्रीत घडलं! ठाकरे सेनेनं चक्क भाजप उमेदवाराला दिला पाठिंबा? कुठे घडलं?
महाराष्ट्र गद्दारांना कधी ही माफ करत नाही. गुवाहाटीचे त्यांनी डोंगर पाहीले असतील. पण महाराष्ट्रात रायगड आहे. त्या रायगडावर टकमक टोक आहे. त्यावरून तुझा कडेलोट केल्या शिवाय राहाणार नाही असा इशारा ठाकरे यांनी दिला. गेल्या वेळीच दिपक आबांना उमेदवारी देण्याचं ठरलं होतं. पण त्यावेळी धरण फोडणारा खेकडा मध्ये घुसला, असं म्हणत त्यांनी तानाजी सावंत यांनाही लक्ष केले. त्यामुळे या गद्दाराला संधी दिली याची कबूली उद्धव ठाकरे यांनी दिली. आता आघाडीचे उमेदवार दिपक साळुंखे आहे. काहींनी बंडखोरी केली आहे. पण आघाडीचे उमेदवार हे दिपक आबाच आहेत. आता मशाल पेटली आहे. त्यामुळे सगळं वातावरण गरम झालं आहे. त्यामुळे दिपक आबांना आमदार म्हणून निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world