विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाकयुद्ध चांगलेच रंगले आहेत. प्रत्येक सभेत शाह ठाकरेंना आव्हान देत आहेत तर ठाकरे त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. अमित शाह यांनी कलम 370 आणि राम मंदीरावरून उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. त्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना सुनावत, अमित शाह हे मुन्ना भाई MBBS मधल्या सर्कीट सारखं करत असल्याचा पलटवार केला आहे. शिवाय तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तर गृहमंत्र्यां सारखे वागा असा सल्लाही ठाकरे यांनी दिला आहे. सांगोला इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित शाह हे लगे रहो मन्ना भाई मधील सर्कीट सारखं वागत आहेत. बोल क्या भाय, क्या कर रहेला है, किसको उठाना है, तू बोल ना मै है ना... असं शाह यांचे सुरू आहे असे ठाकरे म्हणाले. काय ही माणसं आहेत आणि काय त्यांची भाषा आहे. अमित शाह यांना त्यांच्या डोक्याला ब्राम्ही तेल लावलं पाहीजे. ते महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370 चा विषय काढत आहे. पण कलम 370 हटवताना भाजपला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता हे शाह विसरले आहेत. ज्या वेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना त्याच्या घरा बाहेरही कोणी ओळखत नव्हतं त्यावेळी कश्मिरी पंडीतांना बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सहारा दिला होता याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. शिवाय तुम्ही आतापर्यंत किती कश्मीरी पंडीताना पुन्हा कश्मीरमध्ये नेले अशी विचारणा ठाकरे यांनी केली.
ट्रेंडिंग बातमी - शहाजी बापूंच्या गडात उद्धव ठाकरेंचं 'काय झाडी काय डोंगर' सभा गाजवली
आम्ही कुठे बसतो काय करतो याची हेरगिरी करण्या पेक्षा अमित शहा यांनी देशात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रातल्या जनतेला रोजगार हवा, महागाई पासून मुक्ती हवी, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव हवा, पण शाह महाराष्ट्रात येवन राम मंदीर आणि कलम 370 वर बोलत आहेत. मोदी शाह हे इकडे भाषण ठोकत असताना तिकडे मणिपूरमध्ये एका 31 वर्षाच्या महिलेवर सामूहीक बलात्कार करण्यात आला. तीला तिन मुलं होतं. नराधमांचे येवढ्यावर भागले नाही तर त्यांनी तिचा जिवंत जाळले. त्यामुळे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी मणिपूरकडे लक्ष दिलं पाहीजे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात याची आठवण यावेळी ठाकरे यांनी करून दिली.
ट्रेंडिंग बातमी - 'मी काय म्हातारा झालोय का? 84 वर्षाचे शरद पवार असं का म्हणाले?
मला संपण्याची स्वप्न शाह पाहात आहेत. पण मला संपवण्या पेक्षा मणिपूरकडे लक्ष द्या असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. तुम्हास ते जमत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहीजे. त्यानंतर त्यांनी पुर्ण वेळ भाजपचा प्रचार करावा असेही ठाकरे म्हणाले. तुम्हाला देशा पेक्षा निवडणूका महत्वाच्या वाटत आहेत. त्यामुळे तुम्हा सर्व सोडून स्टार प्रचारक म्हणूनच फिरा असे त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - आक्रीत घडलं! ठाकरे सेनेनं चक्क भाजप उमेदवाराला दिला पाठिंबा? कुठे घडलं?
ज्या भाजपला आता पर्यंत खाद्यावर घेवून वाढवलं त्यांना या निवडणुकीत खांदा देणार असे ठाकरे यावेळी म्हणाले. शाह यांनी फडणवीस मुख्यमंत्री होणार असं सांगितलं आहे. त्यामुळे आता मिंदेला सांगा भांडी घास. त्यांच्या जोडीला डोंगूरवाल्याला सांगा त्याला माती द्या भांडी घासायला, असा टोलाही यावेळी ठाकरे यांनी लगावला. शिवाय मुस्लीमांना पक्षात प्रवेश देणार नाही अशी पाटीच भाजपनं आपल्या कार्यालया बाहेर लावाली असे आवाहन त्यांनी भाजपला केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world