जाहिरात

'दांडिया'तील विजेत्यांना iPhone 16 चे बक्षीस, मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

नवरात्रोत्सव संपला असून या नवरात्रोत्सवात भाजपने मुंबईतील मराठी मते आपल्याकडे वळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले.

'दांडिया'तील विजेत्यांना iPhone 16 चे बक्षीस, मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
मुंबई:

विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024)  घोषणा दसऱ्यानंतर (Dussehra 2024) कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी दोन महत्त्वाचे उत्सव साजरे करण्यात आले. नवरात्रोत्सव (Navaratri) आणि दसरा (Dussehra Celebration). या दोन्ही उत्सवांना डोळ्यासमोर ठेवत विविध राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. नवरात्रोत्सव संपला असून या नवरात्रोत्सवात भाजपने मुंबईतील मराठी मते आपल्याकडे वळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. गेल्या काही वर्षांपासून साजरा करण्यात येणारा मराठी दांडिया (Dandiya) हा त्याचाच एक भाग होता. 

नक्की वाचा: होमगार्ड्सची दिवाळी गोड होणार, मानधनात घसघशीत वाढ, आता मिळणार...

अभ्युदयनगर काळाचौकी हा मराठीबहुल भाग म्हणून सुप्रसिद्ध आहे. लालबाग, परळ, काळाचौकी हा संपूर्ण परिसत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. इथे मराठी दांडिया आयोजित करण्यास भाजपने गेल्या काही वर्षांत सुरूवात केली होती. यावर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने हा कार्यक्रम आणखी मोठा करण्याचा निर्णय घेतला होता. सात दिवस चालणारा हा दांडिया कार्यक्रम सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला होता. आपण  सर्वसामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवले होते असे भाजपतर्फे सांगण्यात आले. या दांडियामध्ये दररोज ‘सर्वोत्कृष्ट वेशभूषा' करून येणाऱ्या नागरिकाला बक्षिसे देण्यात आली. आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोत्कृष्ट  महाराष्ट्रीय पारंपारिक वेशभूषा करणाऱ्या स्त्री आणि पुरुष यांना iPhone 16 बक्षिस म्हणून देण्यात आले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com