राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होवू शकते. आचारसंहीता लागल्यानंतर सरकारला कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे सरकारने सध्या निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. त्यात आता होमगार्डसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे राज्यातल्या होमगार्ड्सची दिवाळी गोड होणार आहे. अनेक वर्षापासून होमगार्ड आपल्या मानधनात वाढ केली जावी अशी मागणी करत होते. त्यांना सध्या मिळणारे मानधन हे अगदी तोकडे आहे. त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतला आहे. होमगार्ड्सच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यात आले आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. होमगार्डना दिवसाला 570 मानधन दिले जात होते. मात्र त्यात आता वाढ करून 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. जवळपास हे मानधन दुप्पट करण्याच आले आहे. हे मानधन देशात सर्वाधिक असल्याचा दावा सरकारने केला आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे.
राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2024
आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.
याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये… pic.twitter.com/iIUFmzskeI
ट्रेंडिंग बातमी - 'शस्त्र बाहेर काढा, क्रांती करा, वचपा काढा' सर्वांच्या मेळाव्या आधी 'राज' गर्जना
त्यानुसार उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये करण्यात आला आहे. तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यात तब्बल 55,000 होमगार्ड्स आहेत. त्यामुळे त्यांना याचा थेट फायदा होणार आहे. या निर्णयाची 1 ऑक्टोबर 2024 पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. ही वाढ ऑक्टोबरपासूनच देण्यात येईल. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात 11 हजार 207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यांनाही याचा फायदा मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world