जाहिरात

Jalgaon News : अंगावर गाडी घालून पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

गुरे चोरी करणाऱ्या टोळीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गाडी घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाठलाग करुन दोघांना अटक केली आहे. 

Jalgaon News : अंगावर गाडी घालून पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

मंगेश जोशी, जळगाव

Jalgaon News : जळगावमध्ये पोलीस अधिकाऱ्यांला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुरे चोरी करणाऱ्या टोळीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गाडी घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाठलाग करुन दोघांना अटक केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावाजवळ पोलिसांना पाहून कारद्वारे पळणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग केला. अकोला जिल्ह्यातील बाळापुरजवळील रिधोरा गावाजवळ पोलिसांनी रस्त्यावर चक्क ट्रक आडवा लावला आणि या टोळीची कार अडवली.  

(नक्की वाचा-  Farmer Death : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?)

त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे टोळीला पकडण्यासाठी गाडीतून उतरले. मात्र त्यावेळी या टोळीने संदीप पाटील यांच्या अंगावर थेट गाडी घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने संदीप पाटील हे थोडक्यात बचावले असले तरी ते किरकोळ जखमी झाले आहेत.

(नक्की वाचा-  Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी)

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील दोन जणांना अटक केली असून या टोळी कडून कारसह एक बैल तसेच तलवार, गुप्ती, चाकू, लोखंडी रॉडही जप्त केले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com