Jalgaon Train Accident: जळगावच्या पाचोरामधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या परधोड रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या आगीच्या भितीने काही प्रवाशांनी उड्या मारल्या, अशातच त्यांना समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस ट्रेनने उडवल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोठी जिवीतहानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून 5 ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावमधील परांडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस या मुंबईकडे निघालेल्या ट्रेनचा एक मोठा अपघात झाला आहे. परांडा रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस गाडीने ब्रेक मारल्यानंतर चाक आणि रुळाचे घर्षण झाले आणि जाळ निघाला. हा जाळ पाहून दारात बसलेल्या प्रवाशांना वाटले गाडीला आह लागली. त्यामुळे त्यांनी गाडीला आग लागल्याची बातमी ट्रेनमध्ये पसरली. या आगीच्या भितीनेच पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी गाडीतून रुळावर उड्या मारल्या.
त्याचवेळी दुसऱ्या दिशेने भरधाव वेगाने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. अचानक प्रवाशांनी रुळावर उड्या मारल्याने अनेक प्रवासी कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडले गेले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा सात ते आठ इतका असल्याचे समोर आले आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान आणि प्रशासनाने मदतकार्य सुरु केले आहे. या अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
नक्की वाचा - Bangladesh Illegal migration : बांगलादेशींनी राज्यभर हात-पाय पसरले, कोकणातून धक्कादायक प्रकार उघड
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world