
Mumbai-Amravati Express Accident : जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅकवर आला. मुंबई-अमरावती एक्सप्रेसला हा ट्रक धडकला. बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ही घटना घडली. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे. पहाटे 4 वाजेपासून मुंबई-हावडा मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Crime news: वर्षभरात 42 हत्या, 52 हाफ मर्डर,'या' जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस
बोदवड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे मुंबई हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर आणि हावडाकडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ-जळगाव रेल्वे स्थानकावर थांबवल्या तर हावडा-नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मलकापूर व अकोला रेल्वे स्थानकावर थांबवल्या. गेल्या तीन तासांपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघातस्थळी रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world