जाहिरात

Jalna Crime: 'फिरायला जायचंय', कॉलेज तरुणीला कारमध्ये बसवलं, जालन्यातून आळंदीला नेलं, पुढे जे घडलं...

जालना जिल्ह्यातील शहागड बसस्थानकात आली होती. यावेळी ओळखीच्या नातेवाईकाने तिला 'आपल्याला फिरायला जायचे' म्हणत कारमध्ये बसवून घेतले.

Jalna Crime: 'फिरायला जायचंय', कॉलेज तरुणीला कारमध्ये बसवलं, जालन्यातून आळंदीला नेलं, पुढे जे घडलं...

लक्ष्मण सोळुंके, जालना:

Jalna Crime:  जालन्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  नात्यातील मुलीला फिरायला जायचं म्हणून कारमध्ये घेऊन जात पुण्यातील आळंदीतील एका मंदिरात घेऊन जात मुलीची इच्छा नसताना 'लग्न कर नाहीतर तुला जिवंत मारून टाकू,' अशी धमकी देत तरुणीचे बळजबरीने लग्न लावून घेतल्याचा प्रकार अंबड तालुक्यातील एका तरुणीसोबत घडला आहे. 

मुलीचे बळजबरीने लग्न...

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना अंबड तालुक्यातील एका गावात घडली आहे. पिडीत मुलगी ही बीड जिल्ह्यातील गेवराई येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेते. 21 जानेवारी रोजी सकाळी 11 तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी जालना जिल्ह्यातील शहागड बसस्थानकात आली होती. यावेळी ओळखीच्या नातेवाईकाने तिला 'आपल्याला फिरायला जायचे' म्हणत कारमध्ये बसवून घेतले.

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'बाबत महत्त्वाची अपडेट! अदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा; EKYCची कोणतीही अडचण...

यानंतर आळंदीत नेऊन बळजबरीने एका मंदिरात मुलीचे लग्न लावून घेतले. या लग्नाचे प्रमाणपत्रही संस्थेकडून घेण्यात आलं. नातेवाईक आपल्या मुलीला घेऊन गेल्याची माहिती कळाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी 'मुलीचा होकार असेल तर लग्न लावून देतो,' असे सांगितले. परंतु, त्याआधीच आळंदी येथे मुलीचा विवाह उरकून घेण्यात आला. ही घटना मुलीने घरी आल्यानंतर आईवडिलांना सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या आई वडिलांनी पोलिसात धाव घेतली.

चौघांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून आपल्याला नातेवाईकांनी 'लग्न कर, नसता तुला जिवंत मारून टाकू,' अशी धमकी देत आपला विवाह बळजबरीने लावल्याचा तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी महेश राजेंद्र काकडे, सोनू राजेंद्र काकडे यांच्यासह दोन महिला अशा चार जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास  गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहे.

Crime News: नालासोपाऱ्यात 'स्टिंग ऑपरेशन'ने खळबळ! विनापरवाना गर्भपात करणाऱ्या 3 डॉक्टरांवर गुन्हे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com