Maharashtra Ladki Bahin Yojana Helpline: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी ईकेवायसी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच आता ईकेवायसी करुनही हप्ता जमा होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीबाबत कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
Mumbai News: मंत्री झेंडावंदन करणार, मुलगा फरार आरोपी; हायकोर्टाने असं झापलं की राज्यभर चर्चा झाली
लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन क्रमांक..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 23, 2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही… pic.twitter.com/B2mi5KmKxT
मंत्री अदिती तटकरेंनी दिली माहिती
तसेच याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world