
jayant Patil Resign: राज्याच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याजागी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी त्याची त्याची घोषणा होईल असंही बोलले जात आहे.
Sharad Pawar: जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवारांची भूमिका ठरली, कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितली
जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा (Jayant Patil Resign)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अखेर खांदेपालट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याजागी शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाव चर्चेत आहे. येत्या मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापनदिनीच जयंत पाटील यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मला पवार साहेबांनी संधी दिली. सात वर्षांचा काळ दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती. जयंत पाटील यांच्यानंतर रोहित पवार, रोहित पाटील यांचे नाव प्रदेशाध्यपदासाठी चर्चेत होते. म

काय म्हणाले शशिकांत शिंदे?
दरम्यान, या बातम्यांवर शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे हे माझे भाग्य आहे.15 जुलैला ते जाहीर होईल. मला जर संधी मिळाली तर नक्कीच पक्ष वाढविण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझा लोकसभेला,विधानसभेला पराभव होऊनदेखील मला संधी मिळते आहे हे माझं भाग्य असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे
कोण आहेत शशिकांत शिंदे? (Who is Shashikant Shinde)
राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत असलेले शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात. शशिकांत शिंदे हे साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदार संघात कार्यरत आहेत. या मतदार संघातून त्यांनी दोनदा आमदारकी मिळवली होती. माथाडी कामगारांचे नेते अशीही त्यांची ओळख आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सातारा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र यामध्ये त्यांचा उदयनराजे भोसले यांनी पराभव केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world