Kalyan Crime: जास्त मोठा झाला का ? आत्ता तुला बघतो असे सांगून आपल्या हस्तकांना पाठवून एका रेल्वे कंत्राटदारावर जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला करविणारा कल्याणमधील कुख्यात प्रशांत देशमुख उर्फ पीडी आहे. बाजारपेठ पोलिसांनी कंत्राटदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पीडी याने गेल्या काही वर्षापासून अनेकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
कल्याणमध्ये रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याणमधील राहणारे विशाल नायडू हे रेल्वेचे कंत्राटदार आहेत. होळीच्या दिवशी त्यांच्या एका मित्राचा फोन त्यांना आला. त्या मित्राने नायडू यांना सांगितले की, प्रशांत देशमुख याच्याची बेालून घे. प्रशांत देशमुख आणि विशाल नायडू यांची ओळख आहे. परंतू विशाल नायडू यांच्या मित्रावर चार वर्षापूर्वी हल्ला झाला होता. त्या हल्लाा प्रकरणात प्रशांत देशमुख याचे नाव आले.
त्यामुळे विशाल याने प्रशांत याच्याशी बोलणे बंद केले. होळीच्या दिवशी विशाल नायडू आणि त्याचा मित्र अनिकेत माने हे विशालच्या घरी असताना अनिकेत माने याच्या मोबाईलवर प्रशांत देशमुख याचा फोन आला. प्रशांतने अनिकेतला सांगितले की, विशाल नायडूला मला फोन करायला सांग. विशाल नायडूने प्रशांत देशमुखला फोन केला. प्रशांतने त्याला शिवि दिली. तूला चरबी आली आहे. तुला खूप मोठे व्हायचे आहे. आमच्या पुढे जातो का ? असे सांगून आज तुला मारायला प्रतिकला पाठवतो.
रुग्णालयात उपचार सुरु
यानंतर विशाल याने प्रशांतला सांगितले असे काही नाही. दोन दिवसांनी तुला भेटतो. त्यानंतर विशाल नायडू जेवण आणण्यासाठी घराखाली उतरले. आधारवाडी सर्कल समोर आले असता त्याठिकाणी प्रतिक ठाकरे , शुभम नाडे, सुजय कदम आणि अक्षय तेली यांच्यासह अन्य दोन ते तीन जण थांबलेले होते. शुभम नाडे याच्या हाती चाकू होता.
तिथे जमलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवित आमच्या मध्ये पडू नका. नाही इथेच खलास करु. त्यानंतर विशाल याला मारहाण करण्यात आली. विशाल नायडू याच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखळ केला आहे. परंतू या प्रकरणात अद्याप आरोपी अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रशांत देशमुख हा कुख्यात आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहे.
(नक्की वाचा: Nagpur News: रंगाचा थेंब पडला अन् आजीने 4 वर्षाच्या नातवावर उकळतं पाणी ओतलं, CCTV पाहून होईल संताप; पाहा VIDEO)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world