जाहिरात

Kalyan: कल्याणमधल्या 2 शाळेत जायला धड रस्ताच नाही, शेकडो विद्यार्थ्यांचे हाल! मनसेचा KDMC ला अल्टीमेटम

Kalyan School News:  कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात दोन शाळा आहेत. या शाळेत 1100 विद्यार्थी शिकतात

Kalyan:  कल्याणमधल्या 2 शाळेत जायला धड रस्ताच नाही, शेकडो विद्यार्थ्यांचे हाल! मनसेचा KDMC ला अल्टीमेटम
Kalyan School News : मनसेनं या प्रकरणात KDMC ला अल्टीमेटम दिला आहे.
कल्याण:

Kalyan School News:  कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात दोन शाळा आहेत. या शाळेत 1100 विद्यार्थी शिकतात. या शाळेचा रस्ता खासगी जागेतून जातो. या रस्त्यावर विकासकाने काम सुरु केले आहे. त्यामुळे हा रस्ता चिखलमय आहे. या चिखलातून विद्यार्थी पायपीट करीत आहे. हा रस्ता बंद करण्याचा निर्णय विकासकाने घेतला. दुसरा पर्याची रस्ता आहे. त्या रस्त्यात आरटीओने जप्त केलेली वाहने ठेवली आहे. तसेच त्या रस्त्याला संरक्षक भिंत आहे. 

ही जागा सरकारची आहे. या जागेवर डीपी रस्ता खुला केला तर विद्यार्थ्यांची वाट सुकर होईल. पण अद्याप याबाबत केडीएमसीनं काहीही हलचाल केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (16 जुलै) आंदोलन केले.  मनसे जिल्हाधिकारी उल्हास भोईर आणि कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून हा रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

( नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )

काय आहे प्रकरण?

कल्याण पश्चिमेला  भारतीय हायस्कूल आणि पोटे विद्यालय या दोन शाळा आरटीओ कार्यालय परिसरात आहेत. या शाळेत एकूण 1100 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेकडे जाणारा रस्ता खासगी जागेवर आहे.  त्याठिकाणी विकासकाने काम सुरु केले आहे. रस्ता  चिखलमय झाला आहे. या परिसरात कचरा टाकला जातो. चिखलमय वाटेतून शाळा गाठताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते.

हा रस्ता बिल्डरने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शाळा 20 वर्षे जुन्या आहेत. शाळेचा बाजूला महापााालिकेच्या डीपी रस्ता प्रस्तावीत आहे. या रस्त्यावर आरटीआेकडून जप्त करण्यात आलेली वाहने ठेवली आहे. त्याठिकाणी एक संरक्षक भिंत आहे. हा रस्ता तयार झाला तर विद्यार्थ्याची वाट सुकर होईल. हा रस्ता जेसीबीने खुला करण्याचा प्रयत्न मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आणि कार्यकर्त्यांनी केला. 

( नक्की वाचा : Kalyan News: 6 तासांमध्ये आरोपत्र, 35 दिवसांमध्ये निकाल! महिलेबरोबर भयंकर कृत्य करणाऱ्या आरोपीला शिक्षा! )

महापालिका या समस्येकडे लक्ष देत नसल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष भोईर हे जेसीबी घेऊन शाळेच्या ठिकाणी पोहचले. रस्ता जेसीबीने खुला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महापालिकेने त्यांना मज्जाव केला. जिल्हाध्यक्ष भोईर यांनी सांगितले की. उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी महापालिका अधिकारी पाठवून येत्या मंगळवारी या प्रकरणी बैठक घेण्याचे आश्वासन दिले असले तरी ते आश्वासन आम्हाला मान्य नाही. येत्या दोन दिवसात हा प्रश्न महापालिकेने निकाली लावला पाहिजे.अन्यथा मनसे महापालिकेच्या विरोधात उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com