Kalyan Waldhuni Flyover Closed: कल्याणकरांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या वालधुनी (सुभाषचंद्र बोस) उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी उद्या, २० डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील २० दिवसांसाठी हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
वालधुनी ब्रीज 20 दिवस बंद...
गेल्या काही काळापासून कल्याणमधील पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीवर भर दिला जात आहे. याआधी शहाड उड्डाणपूल आणि एफ केबिन रोडवरील पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. आता तिसऱ्या टप्प्यात वालधुनी पुलाचे डांबरीकरण, बेअरिंग रिप्लेसमेंट आणि एक्सपान्शन जॉइंट्स बदलण्याचे काम केले जाणार आहे. नाताळच्या सुट्ट्यांमुळे शाळांना सुट्टी असल्याने रस्त्यावरील विद्यार्थ्यांची आणि बसची वर्दळ कमी असेल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने या कालावधीत कामाचे नियोजन केले आहे.
कसे असतील वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग? | Know Closed And Ulternative Routes:
प्रवेश बंद 1: कल्याण पुर्वेकडून स्व. आनंद दिघे पुलावरून कल्याण पश्चिमेकडे वालधुनी ब्रिज मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: या मार्गावरील वाहने सम्राट चौक (डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे उजवे वळण घेवुन पुढे शांतीनगर उल्हासनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद 2: उल्हासनगर शहरातून सम्राट चौक मार्गे, वालधुनी ब्रिजवरून कल्याण पश्चिमकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्म्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
नक्की वाचा >> 'KISS कर नाहीतर गोळी मारेन', प्रसिद्ध धबधब्यावर कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं
पर्यायी मार्ग: या मार्गावरील वाहने सम्राट चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे डावीकडे वळण घेवून पुढे स्व. आनंद दिघे ब्रिज वरून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद 3: कल्याण पश्चिम वालधुनी ब्रिज वरून सम्राट चौक मार्गे उल्हानगर व स्व. आनंद दिघे ब्रिज वरून कल्याण पुर्वेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सुभाष चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - सदरची वाहने सुभाष चौक येथुन सरळ पुढे, कर्णिक रोड, प्रेम ऑटो येथे उजवीकडे वळण घेवून शहाड ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world