Thane Vidhan Sabha : एकनाथ शिंदेंविरोधात थोपटले दंड, ठाण्यातून आनंद दिघेंच्या कुटुंबातून मुख्यमंत्र्यांना आव्हान?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजप प्रमाणेच घराणेशाही असल्याचा आरोप केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ( Vidhan Sabha Election) एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे असून ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. कोपरी पाचपाखाडी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात केदार दिघे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - MNS List : विधानसभा निवडणुकीत आणखी एक ठाकरे! अमित ठाकरे 'या' मतदारसंघातून मैदानात

 त्यामुळे केदार दिघे हे कोपरी पाचपाखडी या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातून शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. केदार दिघे यांना लवकरच या सगळ्या संदर्भात पक्षाकडून आदेश दिले जाऊ शकतात. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिंदे गटाच्या उमेदवार यादीत घराणेशाही..
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर भाजपनंतर मनसे आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांच्या यादीत घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजप प्रमाणेच घराणेशाही असल्याचा आरोप केला जात आहे. नेत्याच्या मुलाला, पत्नीला आणि भावाला उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी पहिली यादी जाहीर करत 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. सहा ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत यांना दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्याशिवाय संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांना पैठण येथून, जोगेश्वरी येथून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकरांना, उदय सामंत यांचे बंधू किरण यांनाही राजापूर येथून, खानापूर येथून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास तर माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Advertisement