जाहिरात

Gokul Milk Price: 'गोकुळ'कडून दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा; किती रुपयांनी महागणार?

गोकुळने म्हैस दूध खरेदीमध्ये एक रुपयांची, तर गाय दूध खरेदीमध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय  घेतला आहे. याबाबत संचालक मंडळाच्या सभेत शिक्कामोर्तब निर्णय होण्याची शक्यता आहे.

Gokul Milk Price: 'गोकुळ'कडून दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा; किती रुपयांनी महागणार?

विशाल पुजारी, कोल्हापूर:

Gokul Milk Price Hike:  दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अन् आनंदाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ'कडून दुधाच्या दरात वाढ होणार आहे. गोकुळने म्हैस दूध खरेदीमध्ये एक रुपयांची, तर गाय दूध खरेदीमध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय  घेतला आहे. याबाबत संचालक मंडळाच्या सभेत शिक्कामोर्तब निर्णय होण्याची शक्यता आहे. 

गोकुळ दूध दरात वाढ होणार

महाराष्ट्रातील प्रमुख दूध संकलन संघ असलेल्या गोकुळ दूध दरामध्ये वाढ होणार आहे . कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची, तर गाय दुधासाठी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे म्हैस दूध विक्री दरातही दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

VIDEO: चिडका मुळशी पॅटर्न! सिकंदर शेखवर आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न, थेट मैदानात आला अन्.. पाहा संपूर्ण थरार

दुध उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

 गोकुळच्या दुधाला मुंबई, पुण्यासह सर्वच शहरांमध्ये मागणी वाढत आहे. त्यातही म्हशींचे दूध मुंबईसारख्या शहरात कमी पडत असून, ते वाढविण्यासाठी गोकुळने कंबर कसली आहे. परराज्यातील जातिवंत म्हशी खरेदीच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने काही दिवसांपूर्वी दूध संकलन वीस लाख लिटरपर्यंत पोहोचले होते. मात्र सध्या संकलन कमी झाल्याने दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळच्या वतीने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Wardha News: बापरे! तब्बल 550 जणांचे स्वतःच्या रक्ताने CM फडणवीसांना पत्र; अख्ख गाव का एकवटलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com