निलेश बंगाले, वर्धा:
Wardha Sindhi Railway Villagers News: वर्धेच्या सिंधी रेल्वे येथील ग्रामस्थांनी एक गाव एक मागणी हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. गावात ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी गावातील नागरिकांनी चक्क रक्तानेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला सुरुवात केली असून एका दिवसामध्ये तब्बल साडेपाचशे नागरिकांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना रमी रुग्णालयाच्या मागणीसाठी पत्र लिहिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी गाव एकवटलं
समोर आलेल्या माहितीनुसार, शहरात सन १९५० पासून क वर्ग नगरपरिषद आहे व १९६२पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मागील ६४ वर्षात लोकसंख्या व रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ झाली असूनही आरोग्य सुविधेत कोणतीही वाढ न झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा या मागणी करिता सिंदीकर विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेले असून या मागणीच्या अनुषंगाने २३ फरवरी पासुन सुरु होणाऱ्या उन्हाळी विधानसभा आधिवेशनात सुद्धा तारांकित प्रश्नाना द्वारे हा मुद्दा गाजणार आहे.
Amravati News: खोटी डिग्री, बोगस डॉक्टर.. अमरावतीत सर्वात मोठी कारवाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!
मुख्यमंत्र्यांना पत्र
शहराची लोकसंख्या २२ ते २५ हजार असून शहराच्या १० कि. मी अंतराच्या आत २५ ते ३० खेडे येतात. या खेड्यापाड्यातील लोक सुद्धा आरोग्य सुविधेकरीता याच सिंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर निर्भर आहे. सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सोडल्यास कोणत्याही इतर मध्यम व मोठ्या स्वरूपाच्या आजाराची तपासणी व उपचार होत नाही. परिणामी मोठ्या संख्येने रूग्णांना येथून स्वतःच्या उपचारा करिता ४० कि. मी. वर्धा, सेवाग्राम किंवा ५० कि. मी नागपूर ला जावे लागते व उपचारा करिता पोहचायच्या आधीच बरेच रुग्ण दगावलेले आहेत.
शहरात लॉजेस्टिक पार्क चे काम सुरू असुन भविष्यात शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सदर्ह वरील सर्व बाबी शहराची व शहराच्या आजुबाजुच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या लक्षात घेता जनतेच्या आरोग्य व उपचारा करिता सिंदी (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला श्रेणीवर्धन करून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व प्रकाश आंबिटकर सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री यांचेकडे याबाबतचे निवेदन दिले होते.
मात्र निवेदन देऊनही कोणतीही शासन दखल घेत नसल्याने ३ जानेवारीला सर्वपक्षीय टाळ नाद आंदोलन करण्यात आले होते व आता १९,२० व २१ फरवरी ला नागरिक स्वरक्ताने मुख्यमंत्री यांना १००० पत्र लिहून पाठविणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषद च्या आमदार डॉ. मनीषा कायंदे ह्यांनी २३ फरवरी पासून सुरु होणाऱ्या उन्हाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा लावून धरणार असल्याने हा मुद्दा अधिवेशनात गाजणार असल्याचे संकेत आहे...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world