जाहिरात

Badlapur Home : बदलापुरात घरे महागणार; पंतप्रधान आवास योजनेतील 8 लाखांचं घर दुपटीने महागलं

Badlapur News : बदलापूरमध्ये 2019 मध्ये नगरपालिकेनं बेलवली इथल्या भूखंडावर पंतप्रधान आवास योजना प्रकल्प मंजूर करून घेतला. इथे 325 चौरस फूट क्षेत्रफळाची 2298 घरं बांधण्यात येणार होती.

Badlapur Home : बदलापुरात घरे महागणार;  पंतप्रधान आवास योजनेतील 8 लाखांचं घर दुपटीने महागलं

निनाद करमरकर, बदलापूर

Badlapur News : बदलापुरात पंतप्रधान आवास योजनेतील स्वस्त घरं 8 लाख रुपयांऐवजी 20 लाख रुपयांना मिळणार आहेत. प्रकल्पाला उशीर करणाऱ्या ठेकेदाराला शासनानं तीन वेळा मुदतवाढ दिल्यामुळे प्रकल्पाची किंमत 255 कोटींवरून 434 कोटी इतकी झाली आहे. त्यामुळेच गरिबांसाठीच्या घरांसाठी आता दाम दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बदलापुरातील बेलवली वालिवलीसारख्या ठिकाणी घरासाठी इतकी मोठी किंमत मोजणं परवडण्याजोग नाही. या प्रकल्पात मोठा घोटाळा झाला असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली. तसेच लोकांनी वाढीव किंमतीची घरं घेऊ नयेत असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

( नक्की वाचा : Karuna Sharma : 'मला प्रेमात पाडण्यासाठी 20 कोटींची ऑफर, मुलीला उचलून...' करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप )

बदलापूरमध्ये 2019 मध्ये नगरपालिकेनं बेलवली इथल्या भूखंडावर पंतप्रधान आवास योजना प्रकल्प मंजूर करून घेतला. इथे 325 चौरस फूट क्षेत्रफळाची 2298 घरं बांधण्यात येणार होती. यापैकी 462 घरं झोपडपट्टी धारकांसाठी  मोफत होती. तर 1836 घरं अल्प दरात नागरिकांना दिली जाणार होती. 11.20 लाख रुपये किंमतीच्या घरासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक घरामागे 2.50 लाख रुपये अनुदान दिलं जाणार होतं. याचाच अर्थ नागरिकांना हे घर 8 ते 9 लाख रुपयांमध्ये मिळणार होतं.   

(नक्की वाचा-  Chandrapur News: खाकीतली माणूसकी! 15 दिवसाच्या बाळाला 'तिच्या' एका कृतीने जीवनदान)

मात्र ठेकेदाराने वेगवेगळी कारणं देत कामाला विलंब लावला तसेच शासनाकडून 3 वेळा मुदतवाढ घेतली. परिणामी या प्रकल्पाची किंमत 255 कोटी रुपयांवरून 434 कोटी रुपये इतकी झालीय. त्यामुळे आता इथल्या घरासाठी नागरिकांना 20 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ठेकेदाराने लावलेला विलंब आणि प्रशासकीय दिरंगाई याचा भुर्दंड सर्वसामान्यांना कशासाठी? असा सवाल संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. 

बदलापुरातल्या बेलवली-वालिवली सारख्या भागात 20 लाख रुपयात 325 स्क्वेअर फुटाचं घर परवडण्याजोगं नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा किंमत देऊन लोकांनी ही घरं घेऊ नयेत, असं आवाहन संभाजी शिंदे यांनी केलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: