कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गर्दी टाळण्यासाठी उन्हाळ्यात विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय

Konkan Railway: उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Konkan Railway: उन्हाळ्यामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेहमीच्या गाड्यांना होणारी तुडुंब गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या आहेत. उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाला आहे, यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेहमीच्या गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उन्हाळी स्पेशल 290 फेऱ्या जाहीर केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे चाकरमान्यांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे16 वातानुकूलित गाड्यांच्या फेऱ्यांचाही समावेश आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी जादा फेऱ्या

उन्हाळी स्पेशल गाड्यांबरोबरच एक्सप्रेस गाड्यांनाही डबे जोडण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. यादरम्यान कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या तितकीच असल्याने अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे यंदा देखील पुढाकार घेतला आहे. यापूर्वी कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांच्या 258 फेऱ्या जाहीर केलेल्या असतानाच अधिकच्या 32 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. 

(नक्की वाचा: अति घाई संकटात नेई! अमेरिकेत गुजरातच्या 3 महिलांचा मृत्यू, हवेत 20 फुट उंच उडाली कार)

पश्चिम रेल्वेवर देखील विशेष फेऱ्या

रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारामुळे जादा गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या 290वर पोहोचली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही जादा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे वसई विरार-बोरिवलीमधील चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. 

(नक्की वाचा: संतापजनक! रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेची रस्त्यातच प्रस्तूती, नवजात अर्भकाला बांधले झाडाला)

Advertisement

एर्नाकुलम-ओखा नव्या रूपात

कोकण रेल्वे मार्गावर पोरबंदर कोचूवेल्ली साप्ताहिक एक्सप्रेस पाठोपाठ कोकणमार्गे धावणारी लांब पल्ल्याची एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस ही 5 एप्रिलपासून नव्या रंग-रूपात धावणार असल्याने, ही एक्सप्रेसही प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. उन्हाळी सुटीसाठी बरेच जण कुटुंबासह गावी येण्याचे नियोजन करतात. हीच बाब लक्षात घेऊन उन्हाळी स्पेशल गाड्यांबरोबरच एक्सप्रेस गाड्यांनाही अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. 

27 जूनपर्यंत 24 फेऱ्या  

  • दर गुरुवारी व परतीच्या प्रवासात दर शनिवारी धावणाऱ्या स्पेशल गाड्यांना प्रवाशांचा आतापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कोचूवेल्ली साप्ताहिक एक्सप्रेस 11 एप्रिलपासून प्रवाशांकरिता धावत आहे.
  • 27 जूनपर्यंत 24 फेऱ्या धावणार आहेत, ही गाडी दर गुरुवारी आणि परतीच्या प्रवासात दर शनिवारी धावेल. 
  • या स्पेशल गाडीचे 8 एप्रिलपासून आरक्षण खुले होताच आरक्षित तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आहे. एलटीटी थिविमच्या 32 जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

VIDEO: डरकाळ्या फोडणारा बिबट्या आणि रेस्क्यू ऑपरेशनचा थरार  

Topics mentioned in this article