मोसीन शेख/छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आदिवासी गर्भवती महिलेला वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिची रस्त्यातच प्रस्तूती करावी लागली. संतापजनक बाब म्हणजे या घटनेत नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात एका सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला. यामुळे महिलेला जवळील आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. पण आरोग्य केंद्राचे काम सुरू असल्याने तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते, यामुळे तिला आरोग्य उपकेंद्रामध्ये नेण्यात आले. तेथेही तिच्यावर उपचार करण्यात आले नाहीत, कारण रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने डॉक्टरांनी उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नेण्याचा सल्ला दिला. दरम्यान या महिलेच्या वाटेतील अडचणी काही केल्या थांबत नव्हत्या. शहरामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती, या सर्व अडथळ्यांमुळे महिलेची रस्त्याच प्रस्तूती झाली.
(नक्की वाचा: अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली अन्...)
नागरिकांनी दाखवली माणुसकी
नागरिकांच्या मदतीने एका खासगी गाडीने महिलेला उपचारांसाठी शहरामध्ये नेण्यात आले. तब्बल तीन तासांनंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. यानंतर महिलेला संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले गेले.
नवजात अर्भकला झाडाला ठेवले बांधून
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर असल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यानंतर पुढील उपचारांकरिता महिलेला संभाजीनगरमध्ये हलवण्यात आले. यादरम्यान नवजात अर्भकाला झाडाला बांधून ठेवण्याची वेळ नातेवाईकांवर आली.
(नक्की वाचा: डहाणूतील खलाशाचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू, दीड महिन्यांपासून कुटुंबीय मृतदेहाच्या प्रतीक्षेत)
नातेवाईकांचा गंभीर आरोप
"गंगापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळेच कोणतीही सेवा मिळाली नाही. तसेच रुग्णवाहिका देखील वेळेवर उपलब्ध झाली नाही", असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
नातेवाईकांचा आक्रोश
ग्रामीण भागात आजही आरोग्ययंत्रणा योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोप वारंवार केला जातो. अनेक भागांमध्ये गावकऱ्यांना थेट तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जाण्याची वेळ येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक आक्रोश व्यक्त करताहेत.
VIDEO: बड्या कंपन्यांच्या हेल्थ ड्रींक मुलांसाठी घातक?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world