Konkan Railway : कोकण रेल्वेवरुन प्रवास करताय तर सावधान...कोकण रेल्वे प्रवासादरम्यान एक भीती निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कोकणातील विन्हेरे रेल्वे स्टेशनवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दरोडेखोरांनी रेल्वेचं दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र टीसीच्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळला.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास कोणीतरी उघडलं रेल्वेचं दार...
मध्यरात्रीचे साधारण दोन ते अडीचची वेळ असेल. ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेस विन्हेरे रेल्वे स्टेशनवर पोहोचली. यादरम्यान स्लीपर क्लासचा S-1 कोचचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा अचानक दगडफेक करण्यात आली. प्रवाशांना नेमकं काय घडलं काहीच कळलं नाही. मात्र हे काहीतरी भयंकर असल्याचं टीसीच्या लक्षात आलं. टीसी महेश पेंडसे जीवाची पर्वा न करता रेल्वेच्या दाराजवळ आले.

नक्की वाचा - Pune News : आधी ड्रोनने पाहणी, पहाटे गावावर छापा; पुणे पोलिसांच्या 105 जणांच्या कारवाईची देशभरात मोठी चर्चा
प्रवाशांनो काळजी घ्या...
त्यांनी जोरात दार बंद केलं आणि त्यांनी प्रवाशांना अलर्ट केलं. त्यामुळे दरोड्यांना आत शिरता आलं नाही आणि त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना नागरिकांना अधिक सावध राहण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी बोगीचे दरवाजे आणि खिडक्या लावुन घ्याव्यात असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world