गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
Anganewadi Jatra 2026: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवी आंगणेवाडी यात्रा येत्या 9 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या यात्रेसाठी मुंबईसह देशभरातून येणाऱ्या भाविकांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहता, कोकण रेल्वेने 'साप्ताहिक विशेष ट्रेन' चालवण्याची घोषणा केली आहे.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग
LTT (मुंबई) ते मडगाव
8 आणि 10 फेब्रुवारी रोजी धावणार आहे. ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री 10 वाजता मडगावला पोहोचेल.
(नक्की वाचा- Mumbai Pune Expressway वरील वाहतूक 15 तासांपासून विस्कळीत; काय आहे सद्यस्थिती?)
मडगाव ते LTT (मुंबई)
7 आणि 9 फेब्रुवारी रोजी मडगाववरून संध्याकाळी 4.30 वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता पोहोचेल.
प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती
या विशेष ट्रेनचे आरक्षण आजपासून सर्व रेल्वे आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाइटवर सुरू झाले आहे. रेल्वे स्टेशन (कणकवली आणि कुडाळ) ते आंगणेवाडी या दरम्यान एसटी महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले असून शेअर रिक्षाचीही सोय उपलब्ध आहे.
(नक्की वाचा- Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)
यात्रेचे धार्मिक महत्त्व
आंगणेवाडीची जत्रा ही कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आंगणे कुटुंबीय आणि मानकरी भराडी देवीला 'कौल' लावतात. देवीचा हुकूम मिळाल्यावरच यात्रेची तारीख निश्चित केली जाते. यावर्षी 3 डिसेंबर रोजी झालेल्या कौलानुसार 9 फेब्रुवारी 2026 ही तारीख ठरवण्यात आली आहे. सुमारे 5 ते 7 लाख भाविक या दीड दिवसांच्या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world