जाहिरात

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत धावणार चिपळूण-दिवा मेमू स्पेशल; पाहा संपूर्ण वेळापत्रक

जादा विशेष गाड्या चालवण्याची मागणी होत असतानाच रेल्वे प्रशासनाने चिपळूण-दिवा मेमू स्पेशल जाहीर केली. त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे. 

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत धावणार चिपळूण-दिवा मेमू स्पेशल; पाहा संपूर्ण वेळापत्रक

राकेश गुडेकर, चिपळूण

 Chiplun Diva Unreserved MEMU Schedule 2026: कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच उन्हाळी सुट्टीकरिता चिपळूण-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून ही स्पेशल मेमू कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावणाऱ्या स्पेशलच्या ७ जूनपर्यंत फेऱ्या धावणार आहेत. जादा विशेष गाड्या चालवण्याची मागणी होत असतानाच रेल्वे प्रशासनाने चिपळूण-दिवा मेमू स्पेशल जाहीर केली. त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे. 

MHADA Pune Lottery: पुण्यात स्वस्तात घर खरेदीची सुवर्णसंधी! लॉटरीशिवाय मिळवा म्हाडाचे घर; कुठे अन् किती घरे?

पहिल्यांदाच धावणार चिपळूण-दिवा मेमू स्पेशल!

रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ही गाडी साप्ताहिक स्वरूपाची असून शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवशी धावेल. १ मे ते ७ जून २०२६ या कालावधीत ही सेवा उपलब्ध राहणार आहे. गाडी क्रमांक ०११६० चिपळूण-दिवा स्पेशल चिपळूणवरून दुपारी १५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.१० वाजता दिवा स्थानकात पोहोचेल.

परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०११५९ दिवा-चिपळूण स्पेशल रात्री २३.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूणला पोहोचेल. ८ डब्यांच्या या गाडीमुळे खेड, माणगाव, रोहा आणि पेण यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांना मोठा आधार मिळणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असल्याने ऐनवेळी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा 'लाईफलाईन' ठरू शकते.

गाडी कोणकोणत्या स्थानकांवर थांबेल?

  • ​अंजनी 
  • ​खेड
  • ​कळंबणी बुद्रुक
  • ​दिवाणखवटी
  • ​विन्हेरे
  • ​करंजडी
  • ​सापे वामणे
  • ​वीर
  • ​गोरेगाव रोड
  • ​माणगाव
  • ​इंदापूर
  • ​कोलाड
  • ​रोहा
  • ​नागोठणे
  • ​कासू
  • ​पेण
  • ​जिते
  • ​आप्टा
  • ​सोमटणे
  • ​पनवेल
  • ​कळंबोली
  • ​तळोजा पांचनंद
  • ​निळजे

 Mango Price : 3 लाखात एक 1 किलो आंबा; कोणतं फळ सर्वात महाग? देशातील सर्वात उत्कृष्ट दर्जाचा आंबा कोणता?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com