जाहिरात

Ro ro Service: 'रो-रो'ची वॅगन वहन क्षमता वाढली, आता 'इतके' टन वाहतूक होणार!

रो रो सेवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून वॅगन वाहन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा फायदा वाहकांना होणार आहे. 

Ro ro Service:  'रो-रो'ची वॅगन वहन क्षमता वाढली, आता 'इतके' टन वाहतूक होणार!

राकेश गुडेकर, प्रतिनिधी:

Konkan Railway ro ro Service News: कोकण रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या या रो-रो सेवेच्या माध्यमातून गतवर्षभरात तब्बल 10 हजार 860 मालट्रक्सची वाहतूक करण्यात आली असून ही आर्थिक उलाढाल 27 कोटी रुपयांची झाली आहे. आता रो रो सेवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून वॅगन वाहन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा फायदा वाहकांना होणार आहे. 

रो रो सेवेची क्षमता वाढली...

समोर आलेल्या माहितीनुसार,  कोकण रेल्वे मार्गावर 'रो-रो' सेवेत वापरल्या जाणाऱ्या वॅगन वहन क्षमता वाढवण्यास मान्यता मिळाली आहे. यापुढे वहन क्षमता ५० टनावरुन ५७ टनापर्यंत वाढली असून ५ नोव्हेंबरपासून सेवा सुरळीत झाली आहे. मालवाहतुकीचा वेग आणि प्रमाण वाढणार असल्याने कोकणातील उद्योगांनी व्यापाऱ्याला संजीवनी मिळणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली.

'कर्ज काढा, कर्जबाजारी व्हा, आणि कर्जमाफी मागा!', राधाकृष्ण विखे पाटलांचं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान

कोकण मार्गावर जानेवारी १९९९ मध्ये 'रो-रो' सेवा सुरू झाली. देशातील पहिल्यांदाच सुरू झालेल्या 'रो-रो' सेवेला सर्वाधिक पसंती मिळाली. कोकण मार्गावरुन धावणाऱ्या नियमित गाड्यांपेक्षा 'रो-रो' सेवेतूनच सर्वाधिक उत्पन्न रेल्वेच्या पदरी पडत आहे. यामुळे या सेवेला सर्वाधिक पसंती देण्यात येत आहे.

कोकण मार्गावर मालवाहतूक व्यवस्थेत महत्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यासाठी 'रो-रो' सेवेत वॅगनची वहन क्षमता वाढवण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयामुळे लोखंड-पोलाद, संगमवरी, टाईल्स सिमेंट, बांधकाम साहित्य आणि इतर औद्योगिक वस्तू वाहून नेणाऱ्या ट्रकचालकांसाठी वाढीव वॅगनची वहन क्षमता उपयुक्त ठरणार आहे. यामुळे जड व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीची कार्यक्षमताही वाढणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com