जाहिरात

Ladki Bahin Yojana:e-KYC मधील चुकीला मिळणार माफी, लाडक्या बहिणींना आणखी एक संधी, 31 डिसेंबरपूर्वी शेवटचा चान्स

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana eKYC Update : राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा दिला आहे.

Ladki Bahin Yojana:e-KYC मधील चुकीला मिळणार माफी, लाडक्या बहिणींना आणखी एक संधी, 31 डिसेंबरपूर्वी शेवटचा चान्स
Ladki Bahin Yojana eKYC Update : महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही घोषणा केली आहे.
मुंबई:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana eKYC Update : राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना ज्यांच्याकडून चुका झाल्या आहेत, त्यांना फक्त एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही घोषणा केली आहे.

e-KYC ची अंतिम मुदत काय? 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 ही आहे. एकही पात्र महिला या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ही मुदत देण्यात आली आहे.

यापूर्वी, ई-केवायसी ऑनलाइन पोर्टलवर करताना लाभार्थी महिलेच्या आधार क्रमांकावर नोंद असलेल्या मोबाइलवर ओटीपी येत होता. तो टाकल्यानंतर पुढे वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक टाकावा लागत असे, आणि त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी टाकल्यावर प्रक्रिया पूर्ण होत होती.


( नक्की वाचा : CIDCO Home : नवी मुंबईतील सिडकोच्या घरांचे दर 10 टक्क्यांनी कमी; 17,000 घरांच्या लॉटरीबाबत सरकारचा मोठा निर्णय )
 

कुणाला मिळणार आणखी एक संधी?

ई-केवायसी करताना अनेक महिलांना अडचणी येत होत्या. विशेषतः, ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा ज्या घटस्फोटित आहेत, त्यांना वडील किंवा पती यांच्या मोबाइलवरील ओटीपी मिळणे कठीण झाले होते. यामुळे अनेक लाभार्थी महिला काळजीत होत्या.

महिलांना येत असलेल्या या अडचणी लक्षात घेऊन सरकारने तातडीने उपाययोजना केली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा घटस्फोटित किंवा विधवा महिलांना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर आता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या महिलांना पती किंवा वडिलांच्या निधनामुळे किंवा घटस्फोटामुळे ओटीपीची अडचण येत आहे, त्यांनी स्थानिक पातळीवर महिला आणि बाल विकास विभागाची मदत घ्यावी. अशा महिलांनी त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News : शिळफाटा रोडवर झालं मेट्रोचं मोठं काम, कल्याण डोंबिवलीकरांचा प्रवास कसा बदलणार? वाचा सविस्तर )

चुका सुधारण्याची एकच संधी

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करून सांगितले की, या योजनेतील बहुतांश लाभार्थी महिला ग्रामीण आणि दुर्गम भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करताना त्यांच्याकडून काही चुका होणे साहजिक आहे. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने ही योजना राबवली जात असल्यामुळे, या महिलांना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे.

याच गोष्टीचा विचार करून, e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभाग ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि सोपी ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com