
Ladki Bahin Yojana E-KYC Process: महाराष्ट्राच्या (Mahayuti Government) सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार तसेच घुसखोरी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक महिला व बाल विकास विभागाने जारी केले असून, पुढील दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 18, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://t.co/gBViSYZxcm या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत…
आधार कायद्यातील तरतुदींनुसार, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देखील लाभार्थ्यांची पडताळणी ई-केवायसीच्या (e-KYC) माध्यमातून केली जाणार आहे. यामुळे, योजनेच्या लाभासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींना वगळण्यास मदत होईल आणि योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल.
ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची? । Ladki Babin Yojana E-KYC Step To Stop Process)
१. लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
२. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
३. यात तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल.
४. त्यानंतर या प्रक्रियेची प्रोसेस पूर्ण होईल.
दरम्यान, सध्या तांत्रिक कारणांमुळे पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली दिसत नाहीये. मात्र, शासनाने लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाइट तपासत राहावे आणि प्रक्रिया सुरू झाल्यावर तातडीने ती पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world