2 months ago

Live News Update : पुणे स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रात्री 1 वाजता आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तब्बल 75 तासांनी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी श्वानपथक, ड्रोन कॅमेरे अशा पद्धतीने यंत्रणा राबवली. त्यानंतर 100 ते 150 पोलिसांची फौज बोलवून आजूबाजूच्या ऊसाच्या शेतात देखील आरोपीचा शोध घेतला. 

Feb 28, 2025 22:23 (IST)

AFG vs AUS : अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसानं रद्द, सेमी फायनलमधील टीम निश्चित!

AFG vs AUS, ICC Champions Trophy 2025 Highlights: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा बी ग्रुपचा सामना शुक्रवारी पावसामुळे रद्द झाला. हा सामना रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियानं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

अफगाणिस्ताननं दिलेल्या 274 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 12.5 ओव्हर्समध्ये 1 आऊट 109 रन केले होते. त्यावेळी पावसामुळे सामना थांबवावा लागला. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यानं सेमी फायनलच्या चारही टीम जवळपास निश्चित झाल्या आहेत.

आता सेमी फायनलमध्ये भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या तीन टीम नक्की झाल्या आहेत. तसंच दक्षिण आफ्रिकेचाही प्रवेश जवळपास नक्की आहे. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा 200 पेक्षा जास्त रन्सनं पराभव झाला तरच अफगाणिस्तानला सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे.

Feb 28, 2025 21:48 (IST)

अपक्ष आमदार शरद सोनवने यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवने यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.  शरद सोनवनेंसोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबु पाटे यांचाही प्रवेश झाला.  देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा लढवली होती.

Feb 28, 2025 20:25 (IST)

Live Update: जोस बटलरनं सोडलं इंग्लंडचं कर्णधारपद, निराशाजनक कामगिरीनंतर निर्णय

जोस बटलरनं इंग्लंडच्या वन-डे आणि T20 टीमचं कर्णधारपद सोडलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलग दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान सेमी फायनलपूर्वीच संपुष्टात आलं आहे. त्यानंतर बटलरनं हा निर्णय घेतला. 'मी इंग्लंडचं कर्णधारपद सोडत आहे. हा माझ्यासाठी आणि टीमसाठी योग्य निर्णय आहे,' असं बटरलनं सांगितलं.

Feb 28, 2025 18:54 (IST)

Live Update : स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्ता गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्ता गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे पोलिसांकडून आरोपीची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती

 

मात्र प्रत्यक्षात 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे

Advertisement
Feb 28, 2025 18:52 (IST)

Live Update : मध्य रेल्वे विस्कळीत, केबल जळल्याने सिग्नल यंत्रणा बंद

आंबिवली ते टिटवाळा दरम्यान रेल्वे रुळाशेजारील गवताला आग, आगीत सिग्नल यंत्रणेचे केबल जळून खाक 

केबल जळल्याने सिग्नल यंत्रणा बंद असल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

मॅन्युअली सिग्नल देत रेल्वे ट्रेन आणि मेल सेवा  सुरू ... 

प्रशासनाकडून युद्ध पातळीवर वायरीच्या दुरुस्तीचे काम सुरू

Feb 28, 2025 18:46 (IST)

Live Update : पुणे शिवशाही अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

पुणे शिवशाही अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

Advertisement
Feb 28, 2025 18:11 (IST)

AFG vs AUS : अफगाणिस्तानचा चिवट संघर्ष, ऑस्ट्रेलियासमोर आव्हानात्मक टार्गेट

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा महत्त्वाचा सामना सुरु आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही टीम्सना हा सामना जिंकणं आवश्यक आहे. लाहोरमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करत सर्वबाद 273 रन्स केले. त्यामुळे आता स्पर्धेची सेमी फायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर 274 रन्सचं आव्हान आहे.  

अफगाणिस्तानकडून सेदिकुल्लाह अटलनं सर्वाधिक 85 रन्स केले. तर ऑलराऊंडर अझमतुल्ला ओमरझाईनं शेवटच्या ओव्हर्समध्ये झुंजार खेळी करत 67 रन्स केले.

Feb 28, 2025 17:00 (IST)

Live Update : अखेर जावेद अख्तर आणि कंगना रणौत यांच्यात झाली समेट

अखेर जावेद अख्तर आणि कंगना रणौत यांच्यात समेट झाल्याची माहिती आहे. एकमेकांविरूध्द दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याबाबत दोघेही तयार झाले आहेत. वांद्रे येथील मुंबई महानगर अतिरिक्त मुख्य न्यायाधीश आशिष आवारी यांनी पुढाकार घेत दोघांमध्ये समेट घडवून आणला. न्यायाधीश आवारी यांच्या स्वाक्षरीने या समेटाबाबत न्यायालयीन आदेश  जारी झाला.  

Advertisement
Feb 28, 2025 15:38 (IST)

Live Update: थोड्या दिवसाचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू...', इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी

इंद्रजीत सावंत यांना पुन्हा एकदा धमकी 

एका युट्युब अकाउंट वरील व्हिडिओखाली धमकीची कमेंट 

सावंत माजला आहे. थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. सावंतच्या घरी जाऊन खात्मा करू अशी केली कमेंट 

केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने केली कमेंट 

सोशल मीडियावरील धमकीच्या कमेंट मुळे इंद्रजीत सावंतांची कारवाईची मागणी

Feb 28, 2025 15:36 (IST)

Live Update: मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक, विरोधी पक्षनेता कोण होणार?

मातोश्री-एक तासापासून आमदारांची बैठक सुरु...

विरोधी पक्ष नेत्याच्या नावावर बैठकीत चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती... 

विरोधी पक्ष नेता कोण असावा हा नेमण्याचा अधिकार सर्व आमदारांनी पक्ष प्रमुख या अधिकाराने उद्धव ठाकरे यांना दिले आहेत

परंतु विरोधी पक्ष नेता कोण असावा याच नाव तुम्ही सुचवा असं उद्धव ठाकरे यांनी आमदारांना विचारणा केली आहे 

गेल्या एक तासापासून विरोधी पक्ष नेत्याच्या नावावरून चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती

विरोधी पक्ष नेत्याच्या दोन नावावर बैठकीत चर्चा 

विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला तर विधानपरिषदेत विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर याचा काही परिणाम होईल याबाबत देखील दोन्ही सभागृहातील आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली

Feb 28, 2025 15:34 (IST)

Live Updates:शरद पवार गटाच्या आमदार- खासदारांची बैठक, पक्ष संघटना वाढीवर चर्चा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज सर्व आमदारांची आणि खासदारांची बैठक पार पडली

या बैठकीत पक्ष संघटना वाढीवर चर्चा झाली

पक्ष वाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे

जयप्रकाश दांडेगावकर,शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे

प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत

जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती अखण्यात आली आहे

जिथे रिक्त पद असतील तिथे पद भरली जातील... पदाधिकारी बदलायची जर गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलले जातील

Feb 28, 2025 14:13 (IST)

Live Update: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! हिमनग कोसळल्याने 57 लोक अडकल्याची माहिती

उत्तराखंड मधे मोठी दुर्घटना

बद्रिनाथच्या चमोली मधे घडली घटना

हिमनग कोसळल्याने 57 लोक अडकल्याची माहिती

१० लोकांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती

अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

Feb 28, 2025 12:31 (IST)

Chiplun News: चिपळूणमध्ये भाजपाचा ठाकरे गटाला मोठा धक्का

चिपळूणमध्ये भाजपाने उबाठाला मोठा धक्का दिला आहे. चिपळूण येथील उबाठाचे विद्यमान शहर प्रमुख व माजी नगरसेवक शशिकांत मोदी, शक्ती कुमार चवन,  ज्ञानेश्वर नलावडे यांनी आज भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात  प्रवेश केला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उबाठाला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाहीय. काही दिवसांपूर्वी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.. त्यातच आता भाजपनेही चिपळूणमध्ये शिवसेनेला धक्का दिला आहे.. त्यामुळे आगामी काळात उबाठाची जिल्ह्यातील वाटचाल खडतर असणार आहे..

Feb 28, 2025 11:58 (IST)

Alibag Boat Fire: अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला आग, सर्व खलाशी सुखरूप

अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला आग.

भर समुद्रात बोटीने घेतला पेट, आज सकाळची घटना.

आगीत बोट 80 टक्के जळून खाक.

बोटीवरील जाळी देखील जळाली.

बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती,

बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप.

साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची बोट.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती.

स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली  आग विझविण्याचे काम सुरू

Feb 28, 2025 11:15 (IST)

Kolhapur Fire: राजाराम साखर कारखाना परिसरात भीषण आग

राजाराम साखर कारखाना परिसरात भीषण आग 

 कसबा बावडा येथे असणाऱ्या या कारखान्याला लागलेल्या आगीमुळे नागरिकांची गर्दी

 घटनास्थळी अग्निशमन पथकाचं एक वाहन दाखल

 आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

Feb 28, 2025 11:11 (IST)

Mumbai Fire: मुंबईच्या भायखळा भागातील इमारतीत आग

मुंबईमधील भायखळा पूर्व भागातील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. 

Feb 28, 2025 10:18 (IST)

निलम शिंदे हिचे वडील आणि भावाल व्हिजा मंजूर

कॅलिफोर्नियामध्ये रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर कोमात गेलेल्या निलम शिंदे यांचे वडील आणि भाऊ यांना शुक्रवारी अमेरिकेचा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावास कार्यालयात दोघांनी मुलाखतीला उपस्थित राहिल्यानंतर हा व्हिसा जारी करण्यात आला. 

Feb 28, 2025 09:53 (IST)

शेयर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 74000 च्या खाली

शेअर बाजारात आज ब्लॅक फ्रायडे. सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी तर निफ्टी 275 अंकांनी तुटला. सेन्सेक्स 74000 च्या खाली तर निफ्टी 22,200 जवळ. शेअर बाजार सलग पाच महिने कोसळण्याची ही 31 वर्षातली पहिलीच वेळ आहे. 

Feb 28, 2025 09:25 (IST)

मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी, मुंबई वाहतूक पोलिसांना आलेल्या मेसेजने खळबळ

मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज 

वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात

पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअॅपवर हा धमकीचा मेसेज आला 

बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवर

मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले 

मेसेज करणारी व्यक्ती भारतातील की बाहेरील याचा तपास सुरू

Feb 28, 2025 08:47 (IST)

नेपाळ 6.1 रिश्टर स्केल भूूकंपाने हादरला

नेपाळमधील काठमांडूजवळ शुक्रवारी पहाटे एक शक्तिशाली भूकंप झाला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजली गेली. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अद्याप माहिती नाही. नॅशनल भूकंप मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरच्या म्हणण्यानुसार, काठमांडूपासून 65 किमी पूर्वेला सिंधुपालचौक जिल्ह्यातील कोदारी महामार्गावर पहाटे 3.51 वाजता रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला. काठमांडू खोऱ्यात आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.

Feb 28, 2025 08:40 (IST)

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

नायगाव ते विरारपर्यंत वाहनांची रांग 

10 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा

वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू 

ठाण्याकडून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी 

Feb 28, 2025 08:39 (IST)

सेबीच्या प्रमुखपदी तुहीन कांत पांडे यांची नियुक्ती

सेबीच्या प्रमुखपदी तुहीन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सेबी प्रमुख माधवी पुरी-बुच यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तुहीन कांत पांडे सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. पांडे सध्या केंद्रीय अर्थमंत्रालयात मुख्य सचिव आहेत. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. पांडे १९८७ च्या बॅचचे ओडिशा केडरचे IAS अधिकारी आहे.

Feb 28, 2025 08:37 (IST)

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच हॉलमध्ये 124 विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी

संभाजीनगर शिवराजवळील जटवाडा भागातील ओहर येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गुरुवारी जीवशास्त्राचा पेपर देणाऱ्या 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रातील परीक्षा खोलीला लागूनच संस्था सचिवाच्या कार्यालयात अत्याधुनिक झेरॉक्स मशीनही तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली. या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. 125 विद्यार्थ्यांपैकी 124 विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी प्रश्नांची एकाच  पर्यायावर टिकमार्क केलेले होते. त्यावरून हा सामूहिक कॉफीचा प्रकार असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राचे संचालक जी. जे. जाधव यांना जिल्हा परिषदेची वैयक्तिक मान्यता नसल्याचेही स्पष्ट झाले. तसेच केंद्रात सही केलेल्या 16 पर्यवेक्षकांपैकी एकाही पर्यवेक्षकाला मान्यता नसल्याचे समोर आले आहे.

Topics mentioned in this article