3 months ago

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. अशा वेळी एनडीटीव्ही मराठीच्या हाती महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लागला आहे. 288  पैकी काँग्रेसच्या वाट्याला 105 जागा आल्याचे समोर येत आहे. त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 95 जागा मिळत आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदरात 85 जागा पडल्या आहेत. हेच अंतिम जागावाटप असेल अशी सूत्रांची माहिती आहे.

Oct 02, 2024 15:57 (IST)

बिहारमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळलं, पूरग्रस्ताना मदत करताना घडली दुर्घटना

बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये लष्काराच हेलिकॉप्टर कोसळलं. औराईमध्ये पूरग्रस्ताना मदत करताना घडली दुर्घटना. हेलिकॉप्टरमधील तीनही जवान सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्ताना मदत साहित्य टाकलं जात होते. 

Oct 02, 2024 15:49 (IST)

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासंदर्भात उदय सामंत यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजप नेते नारायण राणे यांनी काही वेळापूर्वी वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना तातडीने वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवल्याची सूत्रांची माहिती.

तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासंदर्भात उदय सामंत यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करणार.

Oct 02, 2024 15:18 (IST)

पूजा खेडकर यांचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

 पूजा खेडकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरु असलेली चौकशी थांबवावी. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडी कडील सुनावणी दुसरीकडे वर्ग करावी, अशी विनंती पूजा खेडकर यांची मुख्य सचिवांकडे केली आहे.  पूजा खेडकर यांची ओबीसी प्रमाणपत्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. अहमदनगर मधील मंत्र्याचा जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव असल्यामुळे सुनावणी दुसरीकडे वर्ग करावी, अशी मागणी खेडकर यांनी केली आहे. 

Oct 02, 2024 15:01 (IST)

भाजपमध्ये खडकवासला मतदारसंघात उमेदवारीवरुन खडाजंगी

पुण्यातील खडकवासला मतदारसंघात भाजपच्या बैठकीत आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक प्रसन्न जगताप, भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाली.  भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाली. आमदार भीमराव तापकीर यांनी कोणालाच बोलू न दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. 

Advertisement
Oct 02, 2024 14:19 (IST)

साताऱ्यातील माची पेठेत कॉम्प्रेसरचा स्फोट, एकाचा मृत्यू

सातारा येथील माची पेठेत कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

Oct 02, 2024 13:23 (IST)

वर्ध्यात अॅम्ब्युलन्समधून रुग्णांऐवजी चक्क दारुची वाहतूक, चौघांना अटक

वर्ध्यात अॅम्ब्युलन्समधून रुग्णांऐवजी चक्क दारुची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात सेवाग्राम पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार आला समोर.  एकूण 5 लाख 26 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त, तर चार जणांना ताब्यात घेतले आहे. सोबतच दारूचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

Advertisement
Oct 02, 2024 12:59 (IST)

तापी नदी पात्राता भावा-बहिणीचा बुडून मृत्यू, धुळ्यातील घटना

तापी नदीपात्रात बुडून भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात ही घटना घडली आहे. सर्वपित्री अमावस्यानिमित्त गावाजवळच असलेल्या तापी नदी पात्रात उत्कर्ष पाटील (वय 13) बहीण वैष्णवीसह गेला होता. उत्कर्ष नदीपात्रात पडला त्याला वाचवण्यासाठी वैष्णवीने प्रयत्न केला. मात्र तिला देखील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडली. 

Oct 02, 2024 11:48 (IST)

सोनम वांगचुक यांच्या समर्थकांच्या संपाचा पर्यटकांना फटका

सोनम वांगचुक यांच्या समर्थकांनी लेहमध्ये संप पुकारला आहे. या संपाचा फटका पर्यटकांना बसत आहे. आंदोलनामुळे अनेक पर्यटक अडकले असून अनेकांची उड्डाणे चुकत आहेत. महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक इथे अडकले आहेत.

Advertisement
Oct 02, 2024 11:39 (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर 

7 तारखेला पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 

राज ठाकरे घेणार पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा 

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत साधणार संवाद 

पुणे ,सातारा ,सांगली ,सोलापूर ,कोल्हापूर, नगर इथले पदाधिकारी 7 तारखेला पुण्यात राहणारे उपस्थित

Oct 02, 2024 10:53 (IST)

अक्षय शिंदे एन्काऊंटरच्या चौकशी समिती स्थापन

अक्षय शिंदे एन्काऊंटरच्या चौकशीसाठी राज्याने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला आहे.

Oct 02, 2024 10:05 (IST)

अटल सेतुवर पुन्हा आत्महत्या

अटल सेतूवर पुन्हा आत्महत्या, बुधवारी सकाळी 8.30 च्या दरम्यानची घटना, फिलिप शहा असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव.

Oct 02, 2024 09:20 (IST)

अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दमदाटी

अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंचायत समितीच्या बीडीओला शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. पंचायत समिती जाळून टाकेन. तुम्हाला आत टाकेन, अशा भाषेत म्हेत्रे यांनी दमदाटी केली. पोलीस किंवा कोणीही काही वाकडं करू शकत नाही. हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधले आहे त्यामुळे हे जळायला मला फार वेळ लागणार नाही.

Oct 02, 2024 09:14 (IST)

भंडाऱ्यातील चांदपूर जलाशय ओव्हरफ्लो होऊन मुख्य कालवा फुटला

भंडारा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर जलाशयाच्या मुख्य उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मुख्य उजवा कालवा ओव्हरफ्लो होऊन कालवा फुटला आणि एकच खळबळ उडाली. कालव्याचे पाणी शेतात शिरल्याने परिसरातील धानपिकाची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून नजिकच्या गावात हे पाणी शिरणार की काय अशी चिंता परिसरातील गावकऱ्यांना लागलेली होती. पाणी वाटपाआधी कालवे आणि नहरांचे मूल्यांकन करणे गरजेचे होते मात्र मूल्यांकन न झाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

Oct 02, 2024 08:59 (IST)

पुण्यातील बावधन भागात हेलिकॉप्टर कोसळलं, दोघांचा मृत्यू

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बावधन परिसरातील डोंगराळ भागात सकाळी 6.45 वाजता घडली, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.