जाहिरात
5 minutes ago

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. अशा वेळी एनडीटीव्ही मराठीच्या हाती महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लागला आहे. 288  पैकी काँग्रेसच्या वाट्याला 105 जागा आल्याचे समोर येत आहे. त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 95 जागा मिळत आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदरात 85 जागा पडल्या आहेत. हेच अंतिम जागावाटप असेल अशी सूत्रांची माहिती आहे.

वर्ध्यात अॅम्ब्युलन्समधून रुग्णांऐवजी चक्क दारुची वाहतूक, चौघांना अटक

वर्ध्यात अॅम्ब्युलन्समधून रुग्णांऐवजी चक्क दारुची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात सेवाग्राम पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार आला समोर.  एकूण 5 लाख 26 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त, तर चार जणांना ताब्यात घेतले आहे. सोबतच दारूचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

तापी नदी पात्राता भावा-बहिणीचा बुडून मृत्यू, धुळ्यातील घटना

तापी नदीपात्रात बुडून भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात ही घटना घडली आहे. सर्वपित्री अमावस्यानिमित्त गावाजवळच असलेल्या तापी नदी पात्रात उत्कर्ष पाटील (वय 13) बहीण वैष्णवीसह गेला होता. उत्कर्ष नदीपात्रात पडला त्याला वाचवण्यासाठी वैष्णवीने प्रयत्न केला. मात्र तिला देखील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडली. 

सोनम वांगचुक यांच्या समर्थकांच्या संपाचा पर्यटकांना फटका

सोनम वांगचुक यांच्या समर्थकांनी लेहमध्ये संप पुकारला आहे. या संपाचा फटका पर्यटकांना बसत आहे. आंदोलनामुळे अनेक पर्यटक अडकले असून अनेकांची उड्डाणे चुकत आहेत. महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक इथे अडकले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर 

7 तारखेला पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 

राज ठाकरे घेणार पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा 

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत साधणार संवाद 

पुणे ,सातारा ,सांगली ,सोलापूर ,कोल्हापूर, नगर इथले पदाधिकारी 7 तारखेला पुण्यात राहणारे उपस्थित

अक्षय शिंदे एन्काऊंटरच्या चौकशी समिती स्थापन

अक्षय शिंदे एन्काऊंटरच्या चौकशीसाठी राज्याने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला आहे.

अटल सेतुवर पुन्हा आत्महत्या

अटल सेतूवर पुन्हा आत्महत्या, बुधवारी सकाळी 8.30 च्या दरम्यानची घटना, फिलिप शहा असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव.

अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दमदाटी

अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंचायत समितीच्या बीडीओला शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. पंचायत समिती जाळून टाकेन. तुम्हाला आत टाकेन, अशा भाषेत म्हेत्रे यांनी दमदाटी केली. पोलीस किंवा कोणीही काही वाकडं करू शकत नाही. हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधले आहे त्यामुळे हे जळायला मला फार वेळ लागणार नाही.

भंडाऱ्यातील चांदपूर जलाशय ओव्हरफ्लो होऊन मुख्य कालवा फुटला

भंडारा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर जलाशयाच्या मुख्य उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मुख्य उजवा कालवा ओव्हरफ्लो होऊन कालवा फुटला आणि एकच खळबळ उडाली. कालव्याचे पाणी शेतात शिरल्याने परिसरातील धानपिकाची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून नजिकच्या गावात हे पाणी शिरणार की काय अशी चिंता परिसरातील गावकऱ्यांना लागलेली होती. पाणी वाटपाआधी कालवे आणि नहरांचे मूल्यांकन करणे गरजेचे होते मात्र मूल्यांकन न झाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातील बावधन भागात हेलिकॉप्टर कोसळलं, दोघांचा मृत्यू

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बावधन परिसरातील डोंगराळ भागात सकाळी 6.45 वाजता घडली, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?
LIVE UPDATE: मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर
dada-bhuse-challenged-by-bandukaka-bachhav-malegaon-assembly
Next Article
दादा भुसें विरोधात कट्टर समर्थकानेच थोपटले दंड, निकाल फिरणार?