2 months ago

हरियाणा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. तर राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यात पुण्यात झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपींचे स्केच जारी केले आहे. त्यांना पकडण्यात यश येतं की नाही याकडेही सर्वांचे लक्ष असेल. 

Oct 05, 2024 20:20 (IST)

सांगलीच्या मिरजेत भाजपला काँग्रेसचा धक्का

सांगलीच्या मिरजेत भाजपला काँग्रेसचा धक्का. भाजपाचे अनुसूचित जाती-जमात प्रदेश सरचिटणीस व माजी मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे यांनी भाजपला दिली सोडचिठ्ठी. भाजप सोडून काँग्रेसमध्ये केला प्रवेश. कोल्हापूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत मोहन वनखंडे काँग्रेसमध्ये दाखल. मोहन वनखंडे भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे स्वीय सहाय्यक होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहन वनखंडेच्या काँग्रेस प्रवेशामुळे मंत्री खाडे विरुद्ध वनखंडे लढत होण्याची शक्यता.

Oct 05, 2024 16:52 (IST)

मेट्रो 3 चा टप्पा लवकरच सुरु होणार- मुख्यमंत्री

मेट्रो 3 चा टप्पा लवकरच सुरु होणार

मोदींच्या नेतृत्त्वात आम्ही विकासकामे पूर्ण करु

Oct 05, 2024 16:50 (IST)

कोविड रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाही- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोविड रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाही

गोरगरीबांच्या पाठीशी उभे राहणारे आमचे सरकार आहे

Oct 05, 2024 16:45 (IST)

नाशिकमध्ये आज काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

नाशिकमध्ये आज काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

इगतपुरी त्रंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील दिली मुलाखत

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे चर्चेत आले होते हिरामण खोसकर

काँग्रेसकडूनच निवडणूक लढण्यासाठी हिरामण खोसकर इच्छुक

इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघात काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक

जिल्ह्यातील विविध मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांनी दिली मुलाखत

काँग्रेसचे नेते कुणाल पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी घेतली इच्छुक उमेदवारांची मुलाखत

Advertisement
Oct 05, 2024 15:49 (IST)

जत तालुक्यातील 40 ते 50 जणांना विषबाधा

माडग्याळसह आसपासच्या गावातील 40 ते 50 व्यक्तींना भगरीच्या तांदळामुळे विषबाधा झाली आहे. नवरात्र उपवास निमित्ताने माडग्याळ गावातल्या दुकानातून खरेदी केलेल्या भगरीच्या तांदळातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  माडग्याळ,व्हस्पेठ,गुड्डापूर आणि आबाचीवाडी येथील 40-50 जणांना विषबाधा झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 

Oct 05, 2024 14:41 (IST)

आदिवासी समाजाच्या आंदोलनाला यश, पेसा अंतर्गत भरतीचा मार्ग मोकळा

पेसा कायद्याअंतर्गत 17 संवर्गातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबाबत राज्य सरकारने जीआर काढला आहे. यासाठी आदिवासी उमेवारांकडून नाशिकमध्ये महिनाभर उपोषण करण्यात आलं होतं, विराट मोर्चाही काढण्यात आला होता. विशेष म्हणजे सरकार या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत आदिवासी आमदार शुक्रवारी मंत्रालयात आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

Advertisement
Oct 05, 2024 13:55 (IST)

बार्शीत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 22 बनावट अर्ज

लडकी बहीण योजनेत आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. महिन्याला दीड हजार रुपये मिळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रे देऊन 22 अर्ज भरले होते. हे अर्ज भरून सरकारची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. सदर 22 अर्जांची तपासणी केली असता बँक अकाउंट हे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, इतर राज्यातील असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

Oct 05, 2024 13:52 (IST)

काँग्रेस 50% आरक्षणाची मर्यादा वाढवणार, राहुल गांधींची घोषणा

आरक्षणाची 50%  मर्यादा काँग्रेस वाढवेल अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. तो कोल्हापूरमध्ये बोलत होते. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून ही सुटलेला नाही. त्यात राहुल गांधी यांनी केलेले हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.   

Advertisement
Oct 05, 2024 12:33 (IST)

नंदुरबारमध्ये भाजपला धक्का, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. ते शहादा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. 

Oct 05, 2024 09:58 (IST)

डहाणू समुद्रकिनारी संशयास्पद बोटीमुळे खळबळ

डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या समुद्रकिनारी 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास स्थानिकांनी संशयास्पद बोट पाहिली. रात्री काही ग्रामस्थ समुद्र किनाऱ्यावर बसले असताना, एक बोट येऊन किनारी थांबली. त्या संशयित बोटीतून हिरव्या रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा लाईट लावला होता. ही बोट डहाणू भागात असलेल्या बोटीपेक्षा वेगळी होती. तिथल्या नागरिकांनी जेव्हा आपल्या मोबाईलच्या लाईटने त्या बोटीला सिग्नल दिल्यानंतर ती पुन्हा खोल समुद्रा निघून गेली. याची कल्पना स्थानिक पोलिसांना देण्यात आली. 

Oct 05, 2024 09:17 (IST)

वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रात बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

वेंगुर्ल्यातील निवती समुद्रात मच्छीमारांची बोट बुडाली आहे. मच्छीमारी करून परत येत असताना ही बोट पलटी झाली. या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला आहे. या बाबत वेंगुर्ले निवती पोलीस ठाण्यातून माहिती देण्यात आली आहे.  

Oct 05, 2024 08:32 (IST)

भिवंडीच्या वालशिंद गावात गोदामाला भीषण आग

मुंबई नाशिक महामार्गा लगत भिवंडी जवळ गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात हायड्रोलिक ऑइल, कापड, प्लास्टिक वस्तू आणि केमिकलचा साठा होता. त्यामुळे आग लागल्यानंतर स्फोट ही होत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.  

Oct 05, 2024 08:25 (IST)

नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के,नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

गुजरातच्या सीमावरती भागाला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा आणि मोठा कडवण परिसरात गेल्या तीन तारखेपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर भूगर्भातूनही आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास मोठा कळवण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून याची नोंद गांधीनगर येथील भूकंपमापन केंद्रात झाली आहे.

Oct 05, 2024 07:37 (IST)

मविआची येत्या 7, 8, 9 तारखेला मुंबई पुन्हा एकदा जागा वाटपाची चर्चा

विजयादशमीच्या आधी जागांचा तिढा सोडवून जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करण्याचे मविआचे प्रयत्न आहेत. मविआत काही जागांचा तिढा कायम आहे. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील घेणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री कोणाचा याबाबत ही पुढची रणनिती याबैठकीत ठरणार आहे. 

Oct 05, 2024 07:34 (IST)

जालन्यात पहाटेच्या सुमारास NIA आणि ATS ची कारवाई

जालना शहरात सकाळी चार वाजल्या पासून NIA आणि ATS च्या पथकाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.जालन्यातील गांधीनगर भागातून एका संशयीताला या पथकाकडून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सकाळी चार वाजल्या पासून NIA आणि ATS च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या मालेगावत ही कारवाई होत असल्याचे समजत आहे. 

Oct 05, 2024 07:31 (IST)

हरियाणा विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात

हरियाणा विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगत आहे. गेल्या दहा वर्षापासून हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. सरकार उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले आहेत. तर तिसऱ्या वेळी सत्तेत येण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. दोन कोटी पेक्षा जास्त मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.  

Oct 05, 2024 07:27 (IST)

राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाची भायखळ्यात हत्या

भायखळा तालुका अध्यक्ष मुन्ना खुर्मी यांची हत्या करण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष होते. मध्य रात्री त्यांची हत्या करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महेंद्र देवडा यांनी ही माहिती दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.