जाहिरात
4 days ago

राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद व फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. ही समिती राज्यातील सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य ठरणार आहे.  

महावितरणचा भोंगळ कारभार पाच वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला

डहाणू महावितरणचा भोंगळ कारभार पाच वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. महावितरणने  टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  दुर्घटनेनंतर महावितरण, ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चिमुकलीचे कुटुंबीय करत आहेत. 

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची कार्यकारणी बरखास्त

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयात चार तास बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे उपस्थित होते.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  महिनाभरात नवीन कार्यकारणी कार्यरत होईल असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितलं. 

प्रदीप शर्मा यांना कोर्टाचा झटका

माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना कोर्टानं झटका दिला आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. 

मिरजमध्ये पेन्सिल कंपनीला आग, साहित्य जळून खाक

मिरज एम.आय डी.येथील एक्सल पेन्सिल या कंपनीत अचानक आग लागली आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही...या कंपनीत वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल बनवले जातंय. आग नेमकी कशी लागली हे समजलं नाही पण वेळीच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने आग आटोक्यात आली आहे.पण या आगीत कच्चा माल आणि साहित्य भस्मसात झाले आहे.

पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला, एकाच मृत्यू

मुंबई गोवा मार्गांवर पनवेल तालुक्यात कर्नाळा अभयारण्य परिसरातील कर्नाळा किल्ल्यावर सहल व ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला,यामध्ये VJTI कॉलेज माटुंगा-मुंबई येथील विद्यार्थी व पर्यटक यांचा समावेश आहे. 40 पेक्षा जास्त पर्यटकांवर मधमाश्यांनी केला हल्ला, 9 जण जखमी तर दोघांची प्रकृती चिंताजनक व संदीप पुरोहित या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Pune News: पुण्यातील 3 BHK फ्लॅटमध्ये 300 हून अधिक मांजरी आढळल्या

पुण्यातील 3 BHK फ्लॅटमध्ये 300 हून अधिक मांजरी आढळल्या आहेत

पुण्यातील हडपसर भागात ही सोसायटी आहे.

 

महापालिकेने ने दिले 48 तासांत स्थलांतर करण्याचे आदेश

पुण्यातील Society for the Prevention of Cruelty to Animals (SPCA) आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांनी संयुक्त कारवाई करत एका 3 BHK घरामध्ये 300 हून अधिक मांजरी “गर्दीच्या” अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघड केला आहे.

घराची मालकीण रिंकू भारद्वाज यांना या मांजरी 48 तासांत हलवण्याचे नोटीस देण्यात आली आहे. 

SPCA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर मालकीण आदेशाचे पालन करत नसेल, तर सर्व मांजरींना प्राणी आश्रयस्थळी हलवले जाईल.

Kesari Patil Death: केसरी टुर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे निधन

पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या केसरी टुर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे वृद्धापळाने निधन झाले आहे. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी केसरी टुर्सची स्थापना केली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. केसरी पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठूी  बांद्रा येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार असून शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

Nashik News: सदोष तणनाशकामुळे येवल्यात कांदा पिकाचे नुकसान

सदोष तण नाशक फवारणीमुळे नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड व धामोडे शिवारात  मोठ्या प्रमाणावर कांदाला फटका बसला असून,गहू पिकावर फवारणारे तणनाशक कांदा पिकावर फवारण्याचा चुकीचा  सल्ला औषध कंपन्यांनी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन महिन्याचे कांदा पिक जळून खाक झाले हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून केली जात आहे.

Wardha Crime: नोकरीचे आमिष देऊन अनेकांना गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

नोकरीचे आमिष देऊन भारतभर सुशिक्षित बेरोजगाराची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे तांत्रिक तपास करत वाराणसी येथून दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, आठ मोबाईल, एक नोट पॅड, एक लाख एकोणवीस हजार रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. हे आरोपी वाराणसी येथील भाड्याच्या घरातून हे रॅकेट चालवत होते वर्धेच्या आष्टी येथील एका सुशिक्षित बेरोजगाराला त्यांनी गंडा घातला होता त्यानी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिक तपास करत या दोन आरोपीला अटक केली आहे.

Ambernath News: अंबरनाथमध्ये वृद्धाचा डंपरखाली येऊन वृद्धाचा मृत्यू

अंबरनाथ पश्चिमेच्या मटका चौकाकडून एक डंपर हुतात्मा चौकाच्या दिशेने चालला होता. हा डंपर उड्डाणपुलावर येताच चढावामुळे त्याचा वेग तुटला आणि पुन्हा तो पुढे नेत असताना तो काही फूट मागे आला. याचवेळी डंपरचा मागे असलेल्या वृद्ध दुचाकी चालकाच्या अंगावरून डंपरचं मागचं चाक गेलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या अपघातामुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून हा अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Hingoli News: हिंगोली शहरातील व्यापाऱ्यांची 51 लाख रुपयांची फसवणूक

 हिंगोली शहरात एका व्यापाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, कमी किमतीत गहू खरेदी करून त्यापासूनचे बनवलेले पीठ विक्री केल्यानंतर नफा मिळवून देणार असं सांगून फसवणूक केली आहे, फसवणूक करणारे चार जण हिंगोली शहरातील आहेत तर एक जण बीड जिल्ह्यातील असल्याचे तक्रारीत सांगण्यात आलय, व्यापारी रऊफ खान पठाण यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Pune News: मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी

मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी 

नितेश राणे यांनी निधी वाटपावरून केलेल्या विधानानंतर राणेंच्या विरोधात पुण्यातील कोथरूड परिसरात लागले बॅनर 

"सत्तेचा माज बरा नव्हे  मंत्री साहेब" निधी वाटपावरून राणे यांच्या विधानावरून टीका 

"मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा नि:पक्षपातीपणा?" बॅनर मधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यात राणेंच्या विरोधात बॅनरबाजी

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; आमदार भास्कर जाधवांचे चुलत बंधू शिंदे गटात जाणार

शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधवांचे चुलत बंधू शिंदे गटात जाणार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव आज शिंदे गटात प्रवेश करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांची पक्षातून हकालपट्टी

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांची पक्षातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याने कारवाई, विलास चाळके आणि राजेंद्र महाडिक आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते करणार प्रवेश

सांगली जीबीएसच्या दोन रुग्णांचा मृत्यू

गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात  मृत्यू झाला आहे.

मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी जि. बेळगाव येथील १४ वर्षीय मुलाचा  जि. सोलापूर सांगोला येथील ६० वर्षांच्या वृद्धेचा समावेश आहे. 

मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या १५ दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील १५ रुग्णांवर उपचार सुरू होते. 

दोन गटात झालेल्या हाणामारी एकाची हत्या, नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील घटना

नाशिकमधील सिन्नर तालुका हत्येच्या घटनेने हादरला. तालुक्यातील दातली गावात काल रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली त्यात एकाचा मृत्यू झाला.  कोयता, कुऱ्हाड या धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला. घटनेत सागर भाबड या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकाचा मृत्यू. तर 6 जण गंभीर  तर 7 किरकोळ जखमी. मयत सागर भाबडला सुरुवातीला गाडीच्या खाली चिरडले आणि त्यानंतर हत्यारांनी त्याच्यावर वार केले. भाऊबंदकी आणि जमिनीच्या वादातून हत्याकांड घडल्याचा पोलिसांना संशय.  संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात. 

अकोल्याच्या महागाव येते अतिक्रमणाविरोधात कारवाई, मात्र बेघर कुटुंब मात्र उघड्यावर

अकोला जिल्ह्यातील महागावात गुरुवारी अतिक्रमणाची कारवाई केल्यानंतर गावातील नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली. दरम्यान काही गावकऱ्यांच्या घरातील चुलीही पेटल्या नसून त्यांना उघड्यावर राहायची वेळ आली. अकोल्याच्या बार्शीटाकळी तहसील कार्यालय मार्फत उच्च न्यायालयाच्या आदेशाने 35 ते 40 घरांवर अतिक्रमणाचा हातोडा तहसीलदार राजेश वजीरे यांनी जेसीबीच्या साह्यायाने चालवला आहे. दरम्यान गावकऱ्यांना राहण्याची जेवणाची पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाने कुठलीही सोय केली नाही. काही लोकांची घरे पाडली. दरम्यान एका कुटुंबात आई-वडिलांकडे बाळंतपणासाठी आलेल्या मुलीला सुद्धा न जुमानता पोलिसांनी त्यांच्या घरांवर सुद्धा कारवाई केली. दरम्यान शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही काही घरांवर अतिक्रमण कारवाई केली. त्यामुळे गावकरी आक्रमक झाले आणि गावकऱ्यांच्या वतीने बार्शीटाकळी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत स्वतः मालकीची जागा नावाने होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

वाहनातून डिझेल, टायर चोरी करणाऱ्या एकाला अटक, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार

मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर उमराणेच्या सांगवी फाटा परिसरात हॉटेल व्यवसायिकांच्या सतर्कतेने वाहनाचे टायर आणि डिझेल चोरी करणाऱ्या टोळीपैकी एकाला रंगेहाथ पकडले आहे. तर अन्य चार जण वाहनातून फरार झाले. मध्यरात्री दोनच्या सुमारास 4 ते 5 संशयित कारमधून आले व हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या ट्रक आणि वाहनातून डिझेल चोरी करत असल्याचे लक्षात येताच हॉटेल चालकाने एकाला पकडले तर बाकी चार फरार झाले. पकडलेल्या एका चोराला पोलिसांनी ताब्यात देण्यात आले.

येत्या 1 मार्चपासून शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक

येत्या 1 मार्चपासून शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक. भेसळीच्या तेलाने शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय

शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी एक मार्चपासून चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि ग्रामसभेतही हा निर्णय घेण्यात आला. शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र, तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.

समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी सुविधा देण्यासाठी कंत्राटदारांची निवड झाली आहे.

समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी सुविधा देण्यासाठी कंत्राटदारांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उच्च न्यायालयात या आशयाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. समृद्धी महामार्गावर मुलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांना त्रास होत होता. शिवाय, सुविधा उपलब्ध नसल्याने त्याकरिता कुठे थांबायची सोय नव्हती आणि वाहन चालकाला उसंत मिळत नसल्याने अपघात घडत होते.  समृद्धी महामार्गावर मुलभूत सुविधा देण्यात याव्यात या मागणी साठी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. शपथ पत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार निवडण्यात आलेल्या 22 पैकी 16 ठिकाणी उपहारगृहे, प्रसाधन गृहे, वाहन दुरुस्ती केंद्र, प्रथमोपचार, पार्किंग, पिण्याचे पाणी, इत्यादी कायम स्वरूपाच्या मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत. 

Live Uodates : मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषिमंत्री कक्षाची स्थापना होणार

मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषिमंत्री कक्षाची स्थापना होणार

कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांची अमरावतीत मोठी घोषणा

कृषिमंत्री कक्षात येणाऱ्या सूचना थेट कॅबिनेटमध्ये मांडणार - ॲड.माणिकराव कोकाटे 

शेतकऱ्यांच्या सूचनांची २४ तासात दखल घेणार 

त्यासाठी चांगले अधिकाऱ्यांची नेमणूक करणार कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच शेतकऱ्यांना आश्वासन 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: