जाहिरात

Latur News: शेतकऱ्याने शेवटी कंटाळून मागितला बंदुकीचा परवाना, कारण काय?

लातूर जिल्ह्यातील वळसंगी गावचे शेतकरी माधव कलमे यांनी शेतामध्ये तीन एकर ऊस लावला आहे.

Latur News: शेतकऱ्याने शेवटी कंटाळून मागितला बंदुकीचा परवाना, कारण काय?
लातूर:

शेतकरी सध्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहेत. कधी ते अवकाळीने हैराण झाले आहेत. तर कधी नापिकीने त्यांच्या डोक्याचं टेन्शन वाढवलं आहे. कर्जबाजारी पणाचं संकट तर त्यांच्या समोर आहेच. त्यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांना आहे. तर अनेक ठिकाणी अती वृष्टीमुळेही शेतीचं मोठ्या प्रमाणात झालं  आहे. त्यात आता नवी समस्या शेतकऱ्या समोर उभी ठाकली आहे. त्यातू त्याने थेट बंदुकीचा परवानाचा सरकारकडे मागितला आहे. 

नक्की वाचा - Rahul Gandhi: 'ट्रम्प खोटं बोलत असतील तर संसदेत सांगा', राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेंज

लातूर जिल्ह्यातील वळसंगी गावचे शेतकरी माधव कलमे यांनी शेतामध्ये तीन एकर ऊस लावला आहे.  मात्र तीन एकरा पैकी 60 टक्के ऊसाचे नुकसान रानडुकरांनी केले आहे. त्यामुळे शेतकरी आता अडचणीत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास लाख ते दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना ऊस लावला. अवघ्या दोन-तीन महिन्यात ऊस काढणीला येणार असताना रानडुकरांनी शेतामध्ये धुडगूस घालत 60% ऊस मोडून जमिनीवर आडवा पडल्याचा पाहायला मिळत आहे. 

नक्की वाचा - PM Modi Speech : 'भारतात दंगली घडवण्याचे षडयंत्र होते' पंतप्रधान मोदींचा मोठा गौप्यस्फोट

त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून प्रशासनाने रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी  बंदुकीचा परवाना द्यावा अशी मागणी करताना  दिसतो आहे. माधव कलमे यांनी त्यासाठी थेट बंदुकीचा परवाना मागितला आहे. बंदुकीचा परवाना दिल्यास आपण रानडुकरांचा बंदोबस्त करू शकतो. त्यातून रानडुकरांचा होणारा त्रास बंद होईल. शिवाय शेतीचे नुकसानही कमी होईल असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे आता सरकार या शेतकऱ्याला बंदुकीचा परवाना देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. की सरकार या रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी काही वेगळं पाऊल उचलणार हे पहावं लागणार आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com