जाहिरात

Latur News: उघड्यावर लघवी करणाऱ्यांना आता करंट लागणार, लातूर पॅटर्न उपक्रमाची जोरदार चर्चा

Latur News: उघड्यावर लघवी करणाऱ्यांना आता बसणार चाप, नव्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होतेय.

Latur News: उघड्यावर लघवी करणाऱ्यांना आता करंट लागणार, लातूर पॅटर्न उपक्रमाची जोरदार चर्चा
"Latur News: उघड्यावर लघवी करणाऱ्यांविरोधात मोहीम"
Canva

- मोसिन शेख, प्रतिनिधी 

Latur News: ​सार्वजनिक ठिकाणी आणि उघड्यावर लघुशंका करणे ही केवळ स्वच्छतेची समस्या नाहीय तर यामुळे आरोग्यासही हानी पोहोचू शकते. वारंवार सूचना देऊनही नागरिक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. पण लातूरमधील 'वसुंधरा प्रतिष्ठान'ने या समस्येवर एक अतिशय प्रभावी उपाय शोधून काढला आहे. रविवारी (21 डिसेंबर) लातूर शहराच्या मुख्य चौकात '3 इडियट्स' या प्रसिद्ध सिनेमातील एका सीनची प्रतिकृती साकारून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात आले.

​'थ्री इडियट्स'मधील त्या सीनची आठवण ​

बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या 'थ्री इडियट्स' सिनेमामध्ये उघड्यावर लघुशंका करणाऱ्याला कशा प्रकारे 'इलेक्ट्रिक शॉक' दिला जातो, हे आपण सर्वांनी पाहिलंय. त्याच संकल्पनेचा आधार घेत लातूरमध्ये एक फलक आणि प्रतिकात्मक रचना उभारण्यात आलीय. "उघड्यावर लघुशंका केल्यास आता करंट लागेल" अशा आशयाचा फलक पाहून येणारे-जाणारे नागरिक थबकले आहेत.  

​डिजिटल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

​केवळ उपक्रम राबवून हे कार्यकर्ते थांबले नाहीत तर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचवलाय. चौकात उभी केलेली ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकही मोठी गर्दी करतायेत. अनेकांनी आपल्या मोबाइलमध्ये या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडीओही कॅप्चर केले आहेत. सोशल मीडियावरही या उपक्रमाची माहिती व्हायरल होतेय. नेटकऱ्यांकडून या 'लातुरी पॅटर्न'चे कौतुक होतंय. डिजिटल प्लॅटफॉर्मवर या विषयाची मोठी चर्चा रंगली आहे.

(नक्की वाचा: Reels Side Effects: आणखी एक Reel आणि सर्वच संपलं! तुमचा मेंदू होतोय गुलाम, क्षणभराचा आनंद ठरेल प्रचंड घातक)

​आरोग्य आणि पर्यावरणासाठी पुढाकार

​वसुंधरा प्रतिष्ठान हे प्रामुख्याने वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी ओळखले जाते. उघड्यावरील लघुशंका आणि शौचामुळे पर्यावरणाचे तसेच सार्वजनिक आरोग्याचेही मोठे नुकसान होतंय. ही समस्या टाळण्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. धाक दाखवण्यापेक्षा किंवा दंड आकारण्यापेक्षा अशा प्रकारे सर्जनशील (Creative) पद्धतीने दिलेला संदेश लोकांच्या अधिक लक्षात राहतोय, असा विश्वास प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलाय.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

​स्वच्छतेसाठी नागरिकांच्या प्रतिसादाची गरज

​लातूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक संस्थाही आता रस्त्यावर उतरल्या आहेत. 'करंट' लागण्याच्या या भीतीदायक पण गंमतीशीर संकल्पनेमुळे किमान काही लोक तरी उघड्यावर लघुशंका करण्यापासून परावृत्त होतील, अशी आशा व्यक्त केली जातेय. हा उपक्रम सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून इतर शहरांमध्येही अशा प्रकारचे प्रयोग राबवण्याची मागणी होतेय.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com