जाहिरात
2 days ago

Legislative Assembly Monsoon Session Live update : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ सभागृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक (State Cabinet meeting) होणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 6 वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज सर्व गिरणी कामगार संघटनांसोबत बैठक घेणार आहेत. आजच्या बैठकीत काही तोडगा निघणार का याकडे  लक्ष लागलं आहे. यांची सर्व गिरणी कामगार संघटनांसोबत दुपारी 4.30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. गिरणी कामगारांच्या (CM Devendra Fadnavis meets with mill workers' unions) आंदोलनात उद्धव ठाकरे आणि मनसेचे बाळा नांदगावकर सामील झाल्यानंतर या आंदोलनाला चांगलाच राजकीय रंग चढल्यानंतर आंदोलनाला धार आली होती. आज मुख्यमंत्री प्रत्यक्ष गिरणी कामगारांसोबत बोलणार असून काही तोडगा निघतो का याकडे लक्ष असणार आहे

LIVE Updates: अखेर जायकवाडी धरण 70 टक्के भरलं

अखेर जायकवाडी धरण 70 टक्के भरलं 

मराठवाड्याला मोठा दिलासा 

जायकवाडी धरणात अजूनही 24 हजाराची आवक सुरूच 

यंदाही जायकवाडी 100 टक्के भरण्याची शक्यता

LIVE Updates: महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक बहुमताने मंजूर

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे विधेयक मांडण्यात आले  होते. आता ते बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. 

LIVE Updates: नाशिक- मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

- भीषण अपघातात 4 जणांच्या मृत्यू

- नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव जवळील आज दुपारची घटना 

- इको कारवर सिमेंट पावडर घेऊन जाणारे कंटेनर झाले पलटी

- इको कार मधील दोन महिला आणि दोन पुरुष अशा चौघांचा मृत्यू

- क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात येऊन कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले

- मयत मुंबईच्या अंधेरीतील रहिवासी असून गुरुपौर्णिमेनिमित्ताने रामदास बाबा यांच्या मठात दर्शनासाठी आले होते

LIVE Updates: आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, पुण्यात पोलिस आयुक्तांना पत्र

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा 

पुण्यात पोलिस आयुक्तांना पत्र 

संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये केलेल्या मारहाणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी 

ठाकरे गटाच्या युवासेना अध्यक्षाच पुणे पोलीस आयुक्तांना पत्र 

संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

LIVE Updates: डेंग्यूमुळे कल्याणमधील तरुणाचा मृत्यू

कल्याणमध्ये डेंग्यू मुळे विलास म्हात्रे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा परिसरात राहत होते विलास म्हात्रे

आत्तापर्यंत केडीएमसी हद्दीत आढळून आले डेंग्यूचे ३५ रुग्ण 

केडीएमसीकडून आत्तापर्यंत २८ हजार घरांचे सर्वेक्षण 

जवळपास ३५० घराजवळ कंटेनर ड्रममध्ये सापडल्या डेंग्यूच्या आळ्या

केडीएमसीकडून सर्व उपायोजा सुरु आहे असल्याची अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची माहिती

LIVE Updates: सचिन कुर्मी हत्या प्रकरणाची SIT चौकशी होणार

राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष सचिन कुर्मी यांची गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती

आरोपीना अजूनही अटक करण्यात आलेली नाही, घरच्यांना वारंवार धमकी दिली जात असल्याने आज हा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता

त्याची पुन्हा चौकशी होणार असून sit ची स्थपना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे

LIVE Updates: हिंजवडी आयटी पार्कसंदर्भात सरकारचा ॲक्शन प्लान करा - CM फडणवीस यांची सूचना

हिंजवडी समस्या संदर्भात झाली बैठक त्यात काही महत्वाचे मुद्दे 

हिंजवडी आयटी पार्कसंदर्भात सरकारचा ॲक्शन प्लान करा - सीएम यांची सूचना 

पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण करणे, खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य - 

सोबतच, मेट्रोचे काम देखील त्वरीत पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना 

पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती, ज्याद्वारे हिंजवडीत पाणी साचणार नाही यासाठीचा अहवाल ही सल्लागार समिती देणार 

ग्रामपंचायत, एमआयडीसी आणि महापालिकेत समन्वय करण्यासाठी एका अधिकाऱ्यावर जबाबदारी दिली जाणार 

उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील उपस्थिती

Live Update : संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, संपत्तीबाबत विचारणा केल्याची माहिती

संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

या नोटीसीत संपत्तीबाबत विचारणा

आयकर विभागाच्या नोटीसीला उत्तर देऊ असं संजय शिरसाट यांच्याकडून सांगण्यात आलं. 

Live Update : विधानपरिषदेत गोंधळ, मराठी माणसाच्या घरांच्या मुद्यानवर दोन्ही शिवेनेचे आमदार आमने सामने

विधानपरिषदेत गोंधळ, मराठी माणसाच्या घरांच्या मुद्यानवर दोन्ही शिवेनेचे आमदार आमने सामने

Live Update : गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला - आशिष शेलार

गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला - आशिष शेलार 

Live Update : पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले असून निळोणा नंतर आता चापडोह धरण देखील लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. दरम्यान निळोणा ओव्हरफ्लो चे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी आणि भिंतीवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी अनेकांनी धरणाकडे धाव घेतली. 

 ओव्हरफ्लो मुळे खळखळ वाहणाऱ्या वाघाडी नदी आणि धरणातील पाणी साठ्याच्या काठावर बसूनही पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. यवतमाळ शहरापासून 11 किमी अंतरावर असलेल्या व निसर्ग सौंदर्यानी नटलेल्या या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा अशी यवतमाळकरांची मागणी आहे.

Live Update : दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा सिंदूर पूल वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला, सिंदूर नावाने ओळखला जाणार नवा पूल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण

Live Update : आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहातील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित

आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहातील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित, निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई   

आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहाचा परवाना रद्द

यानंतर आकाशवाणी आमदार निवासाचे उपहारगृह बंद आहे. 

उपरगृहातील निकृष्ट दर्जाच्या भोजनाबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी या उपहारगृहात राडा घातला होता .

अधिवेशन काळात एरवी वर्ग बघायला मिळणाऱ्या आमदार निवास उपहारगृहात आज शुकशुकाट आहे.

Live Update : गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातूनही दत्तभक्त आज दर्शनासाठी येत असतात. आज श्री दत्त मंदिरात गुरुपूजन, अभिषेक, पूजा, आणि इतर धार्मिक विधीसाठी हे भाविक येत असतात. श्री गुरुदेव दत्तच्या गजरात येथील कृष्णा – पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. मुख्य मंदिरातील स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्‍याने नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या श्रींच्या उत्सव मूर्तीचे भाविक दर्शन घेतायत.. दररोज पेक्षा आज भाविकांची गर्दी असल्याने दत्त मंदिरं भक्तिमय वातावरणाने फुलुन गेले आहे

Live Update : सततच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची वाढली डोकेदुखी

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नाशिकची द्राक्ष पंढरी निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. पावसाचे पाणी द्राक्ष बागेत साचत असल्याने द्राक्ष झाडांच्या मूळ्या चोकप झाल्याने द्राक्षांच्या फांद्यांवर मूळ्या बाहेर आल्या आहे.सततच्या पावसामुळे करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च करावा लागत असल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.वातावरणामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Live Update : गोपाळापूरच्या काल्याने आषाढी वारीची सांगता

आज पंढरपुरात आषाढी वारीची सांगत होत आहे. पंढरपूरच्या वारी सांगतासाठी परंपरेप्रमाणे सर्व मानाच्या संतांच्या पालख्या आज सकाळी गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरासमोर जाऊन पोहोचल्या. या ठिकाणी भाविकांनी एकमेकांना दही दूध काला वाटला. गोपाळकाला गोड झाला...अशा घोषात आषाढीची औपचारिक सांगता झाली. गोपाळकाल्याच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांची मांदियाळी गोपाळपूर येथे एकत्रित झाली होती. तर आता दुपारनंतर सर्व मानाच्या संतांच्या पालख्या विठ्ठलाचे मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.

Live Update : दिल्ली एनसीआरमध्ये दहा सेकंदांपर्यंत मोठे भूकंपाचे धक्के...

दिल्ली एनसीआरमध्ये दहा सेकंदांपर्यंत मोठे भूकंपाचे धक्के...

Live Update : चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात काल रात्री पावसाची उसंत, पाऊस नसल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात

चंद्रपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यात काल रात्री पावसाने उसंत दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्भवलेली पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि गेले दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सव्वा तीनशे मिलिमीटर पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र काल रात्री पाऊस न झाल्याने आता फक्त गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी झाल्यास पूर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ शकते.

Live Update : संभाजीनगरमधील बालगृह प्रकरणाची विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांकडून दखल, बालगृहाच्या चार महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

संभाजीनगरमधील बालगृह प्रकरणाची विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांकडून दखल, बालगृहाच्या चार महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल 

संभाजीनगर बालगृह प्रकरणाची विधानसभेत दखल, NDTV मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर कारवाईचे आदेश, बालगृहाच्या चार महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल 

NDTV मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, संभाजीनगरमधील बालगृह प्रकरणाची विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांकडून दखल, बालगृहाच्या चार महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल 

जिल्हा बालविकास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com