विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 17 नोव्हेंबरला प्रचाराची सांगता होईल. त्यापूर्वी उमेदवारांकडून प्रचाराचा जोर वाढला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गाचा वापर केला जात आहे. अटीतटीच्या या लढाईत कोण बाजी मारहाण हे येत्या 23 नोव्हेंबरला कळेल. राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे राज्यभरात गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पारा कमी झाला आहे.
Live Update : मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख 10 मुद्दे
मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख 10 मुद्दे
1. मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
2. दळणवळण वीज पाण्याचे नियोजन
3. सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग
4. राज्याची औद्योगिक प्रगती
5. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार
6. गडकिल्ले संवर्धन
7. कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
8. राज्याचे करत धोरण सुधारणार
9. डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन
10. घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण
Live Update : राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील सभा रद्द
राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील सभा रद्द, सभेला परवानगी नसल्याने सभा रद्द करण्यात आली
Live Update : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा सादर केला जाणार
मुंबई वांद्रे येथील MIG क्लब येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून मनसे आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमक्या जाहीरनाम्यातून महाराष्ट्राला आणि मतदाराला काय आश्वासन-दावे मांडणार हे काही वेळात समोर येईल
Live Update : पुण्यातील हडपसर येथील इमारतीला मोठी आग
पुण्यातील हडपसर येथील इमारतीला मोठी आग
इमारतीतील एका घराला भीषण आग
अग्निशमन दलाकडून घरातील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले
अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात येत असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे
Live Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार
एमआयजी क्लब येथे मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी असतील हे पाहणं महत्वाचे
Live Update : योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याला मुझफ्फर हुसैन यांचे उत्तर
मिरा-भाईंदरमधे मुझफ्फर हुसैन यांचा जय जिनेन्द्र,जय श्री कृष्ण, जय भवानी जय शिवाजी, जय सियारामचा जयघोष
योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याला मुझफ्फर हुसैन यांचे उत्तर
सर्वधर्मीयांसोबत असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे मुझफ्फर हुसैन यांना मोठा पाठिंबा
Live Update : भाजपमधील अंतर्गत कलह वाढला, बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रवक्त्याला जगदीश गुप्तांकडून नोटीस
भाजपमधील अंतर्गत कलह वाढला, बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रवक्त्याला जगदीश गुप्तांकडून नोटीस...
अमरावती विधानसभेत अपक्ष उमेदवारी दाखल करणारे भाजपचे माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांच्यासंदर्भातील बदनामी कारक वक्तव्याबद्दल भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. कुळकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जगदीश गुप्ता यांच्या संदर्भात बद्दामीकारक वक्तव्य केली होती.. त्याबद्दल कुलकर्णी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी जगदीश गुप्ता यांनी नोटीस मधून केलीय, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू असा इशारा देखील गुप्ता यांनी दिलाय..
Live Update : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा
काँग्रेससह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू
दुपारी एक वाजता गांधी मैदान येथे 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभेतून संबोधित करणार
Live Update : प्रचार शेवटच्या टप्प्यात, आज कोणाकोणाच्या सभा?
महत्वाच्या सभा
गृहमंत्री अमित शाह सभा
यवतमाळ- दुपारी 12.30 वाजता भाजप उमेदवार किसन वानखेडे उमरखेड येथे सभा.
चंद्रपूर- दुपारी 4 वाजता भाजप उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचार सभे साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज चंद्रपुरात.
हिंगोली- दुपारी 1 वाजता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर जाहीर सभा.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे कार्यक्रम
दुपारी 3 वाजता बूथ संपर्क आणि लाभार्थी यांची ठाणे येथे भेट
दुपारी 3.30 वाजता एम, एच, हायस्कूल शिवाजी पेठ ठाणे येथे सभा
संध्याकाळी 6 वाजता संभाजी गार्डन नाशिक येथे सभा
देवेंद्र फडणवीस सभा
सांगली- दुपारी 12.30 वाजता शिराळा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा
पुणे - संध्याकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खडकवासला येथे सभा.
पुणे - संध्याकाळी 8 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसबा येथे सभा.
उध्दव ठाकरे सभा
संभाजीनगर - सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यांची सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार.
संभाजीनगर - सकाळी 11 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा
मनमाड - नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनमाड येथे सकाळी १ वाजता सभा.
मालेगाव - मालेगाव बाह्य मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी २ वाजता मालेगाव येथे जाहीर सभा.
नाशिक - उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा
बारामती- पुरंदर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी 3 वाजता जाहीर सभा.
सांगोला -दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोला येथे जाहीर सभा.
सांगली- दुपारी 2 वाजता खानापूर आटपाडी विधानसभा महायुतीचे शिवसेना गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा.
नंदुरबार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे प्रचार सभा घेणार होते मात्र काही कारणास्तव मुख्यमंत्री यांच्या नंदुरबार जिल्हा दौरा रद्द झाला आहे.
राज ठाकरे सभा
सायंकाळी 5 वाजता दिवा येथे सभा
सायंकाळी 7 वाजता ठाणे येथे सभा
शरद पवार सभा
सांगली- सकाळी 10 वाजता रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा.
अजित पवार सभा
शिर्डी - अकोले मतदारसंघाचे उमेदवार किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांची सकाळी 10 वाजता सभा.
वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सभा
अमरावती- दुपारी 12 वाजता नीलेश विश्वकर्मा यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा.
अमरावती- दुपारी 4 वाजता राहुल मेश्राम यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.
बुलढाणा - देवा हिवराळे यांच्या प्रचारार्थ खामगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे जाहीर सभा.
इतर महत्वाच्या सभा
इंदापूर- इंदापूर तालुक्यातील घोलपवाडी येथे सायंकाळी 6 वाजता हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ युगेद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांची सभा.
धाराशिव- धाराशिव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांची सकाळी 10 वाजता सभा.
सिंधुदुर्ग- सुषमा अंधारे यांची सायंकाळी 4 वाजता वैभववाडी येथे संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.
सिंधुदुर्ग- सुषमा अंधारे यांची कुडाळ येथे संध्याकाळी 6 वाजता वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.
पंढरपूर- सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पंढरपूर येथे जाहीर सभा.
नगर- सकाळी 10 वाजता अजित पवार पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचार सभेसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची सभा.
नगर- सकाळी 7 वाजता शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचार सभेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची सभा.
बीड- दुपारी 12 वाजता धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची सिरसाळा येथे जाहीर सभा.
नाशिक - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची राणी नगर परिसरामध्ये सकाळी 11 वाजता महायुती उमेदवारांसाठी प्रचार सभा. (प्रांजल)
शिर्डी - नेवासा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू यांची सोनई येथे दुपारी 2.30 वाजता सभा.
Live Update : दक्षिण रत्नागिरीला अवकाळी पावसाचा फटका
रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण रत्नागिरीला रात्री अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. रात्री अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि देवरूख भागात पावसाच्या दमदार सरी बरसल्या. भातकापणी अंतिम टप्प्यात आली आहे, त्यात आता पाऊस बरसल्याने शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान आज पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे..