जाहिरात
5 months ago
मुंबई:

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे राज्यभरात प्रचाराचा जोर वाढत आहे. शरद पवारांसह नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या राज्यभरात ठिकठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राची निवडणूक अटीतटीची मानली जात असून संपूर्ण देशाचं याकडे लक्ष आहे. 

धारावीतील लोकांना एक चांगलं घर मिळणार - अमित शाह

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील लोकांना एक चांगलं घर आणि त्यांच्या मुलांना भविष्य मिळणार आहे. त्याचा फायदा फक्त धारावीकरांना होणार नाही. पूर्ण मुंबईची पत या योजनेमुळे वाढणार आहे. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

वक्फचा कायदा बदलणार - अमित शाह

वक्फचा कायदा बदलला पाहिजे की नाही? याला काँग्रेस आणि शरद पवार विरोध करत आहेत. कान उघडे ठेऊन ऐका, हा कायदासुद्धा पारित करणार असे अमित शाह यांनी कांदीवलीच्या सभेत सांगितले. 

आता कश्मीला जायला तुम्हाला भीती वाटणार नाही- अमित शाह

सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं की गृहमंत्री असताना त्यांना काश्मीरला जायला भीती वाटत होती. शिंदे साहेब आता नातवंडासह काश्मीरला जा, तुम्हाला भीती वाटणार नाही. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

23 तारखेला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल स्पष्ट आहे. 23 तारखेला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. आघाडीचा सुपडा साफ होईल.- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या भाषणाला सुरूवात

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. त्यांच्या लोकसभा मतदार संघात ही सभा होत आहे. 

अमित शहांच्या कांदिवलीतल्या सभेला सुरूवात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कांदिवलीतल्या सभेला सुरूवात झाली आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते इथं सभा घेत आहेत. त्या आधी त्यांनी घाटकोपर इथे सभा घेतली होती. 

Live Update : उद्धव ठाकरे यांना हवाई उड्डाणं करण्यास परवानगी नाकारली

उद्धव ठाकरे यांना हवाई उड्डाणं करण्यास परवानगी नाही. औसा सभा संपल्यावर उद्धव ठाकरे उमरग्याच्या सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदी सोलापूरला येणार असल्यामुळे हवाई उड्डाणं करण्यास परवानगी नाकारण्यात आली. सोलापूर आणि लातूर,  धाराशिव यात बरेच अंतर आहे. तरीही पूर्ण उड्डाणं थांबावण्यात आली आहेत. .

Live Update : नवाब मलिक यांच्या विरोधात पुन्हा एकदा ईडीची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवाब मलिक यांच्या विरोधात पुन्हा एकदा ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगवास झाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना जामीन मिळाला नसल्याने अखेर त्यांनी वैद्यकीय कारण पुढे करत आपला जामीन मिळवला. सध्या वैद्यकीय जामीन त्यांना मिळाला असला तरी त्यांची तब्येत ठणठणीत आहे आणि ते प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा शेलमध्ये बोलावून घ्यावे अशा संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात ईडी तर्फे दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवाब मलिक हे पूर्णवेळ प्रचारात दिसणार की त्यांना जेलमध्ये जावे लागणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे 

Live Update : ST कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने संभाजीनगरमध्ये चक्काजाम

छत्रपती संभाजीनगर : ST कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने संभाजीनगरमध्ये चक्काजाम

ST कर्मचाऱ्यांकडून चक्का जाम 

200 पेक्षा अधिक ST बसेस जागेवरच थांबून 

मध्यवर्ती बस स्थानकात वाहक चालकांनी बंदची हाक

Live Update : राहुल गांधींचा दौरा पुढे ढकलला!

राहुल गांधी दिल्लीहून विमानाने संभाजीनगरला निघाले होते, संभाजीनगर येथून ते बुलढाणा येथे जाणार होते. मात्र विमानात तांत्रिक अडचण आल्याने राहुल गांधी यांना संभाजीनगर येण्यापूर्वी पुन्हा दिल्लीकडे परतावे लागले आहे. त्यांचा दौरा पुढे ढकण्यात आला आहे. अशी माहिती सुरक्षा विभागाचे विश्वसनीय सूत्रांनी ही  माहिती दिली आहे

Live Update : पालघर जिल्हा खऱ्या अर्थाने महायुती सरकारने बदलला - देवेंद्र फडणवीस

पालघर जिल्हा खऱ्या अर्थाने महायुती सरकारने बदलला. अनेक लोकांनी वाढवण बंदराबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाढवण बंदरापासून या भागाचे चित्र बदलेल - देवेंद्र फडणवीस 

Live Update : नवाब मलिकांचा जामीन रद्द करा, ईडीची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

नवाब मलिकांचा जामीन रद्द करा, ईडीची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Live Update : पंढरपुरात 6 माजी नगरसेवकांचा शरद पवार गटात प्रवेश

पंढरपुरात 6 माजी नगरसेवकांचा शरद पवार पक्षात प्रवेश

पंढरपुरातून एक मोठी राजकीय घडामोड समोर. येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पंढरपुरात भाजपा आणि काँग्रेसला धक्का दिला आहे.  भाजपा आणि काँग्रेस मधील तब्बल ६  माजी नगरसेवकांचा खासदार अमोल कोल्हे यांच्या साक्षीने शरद पवार पक्षात प्रवेश झाला. यामुळे भालके आणि परिचारक या काँग्रेस आंनी भाजप गटाला मोठा धक्का बसला आहे तर यानिमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या ताकद वाढतांना दिसणार आहे.

Live Update : प्रियंका गांधी 15 ते 18 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार

15 ते 18 नोव्हेंबर प्रियंका गांधी महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार

प्रियंका गांधी यांच्या 6-7 सभा होणार 

विदर्भ, मराठवाड्यात सभा होणार असल्याची माहिती

सध्या महाराष्ट्र विधानसभेसह वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही प्रचार सुरू आहे. 

प्रियंका गांधी वायनाडमध्ये उमेदवार आहेत. 13 नोव्हेंबरला वायनाडमध्ये मतदान होत आहे. या मतदानांतर प्रियंका गांधी महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर

Live Update : अजितला पाडण्याकरिता प्रचार करताय का? - अजित पवार

Live Update : सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय सभा

- सोलापुरातील महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी आज करणार प्रचार..

- जिल्ह्यातील अकरा  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापुरातील होम मैदानावर नरेंद्र मोदी यांची सभा..

- पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दोन वाजता असणार सोलापुरात..

- नरेंद्र मोदी यांच्यासाठी  सोलापुरात पोलिसांकडून विशेष तयारी..

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त

पुणे पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी देखील पुण्यात दाखल झाले. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तास तैनात असतील. सभा होत असलेल्या मैदानावर 1000 पेक्षा अधिक पोलीस तैनात आहेत. 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 23 सहायक पोलीस आयुक्त, 135 पोलीस निरीक्षक, 570 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात

Live Update : कोल्हापुरात तपासणी पथकांकडून तब्बल साडेदहा कोटींचा मुद्देमाल जप्त

कोल्हापुरात आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल दहा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जिल्ह्यात तपासणी पथकांनी अमली पदार्थ, संशयास्पद वस्तू, बेहिशेबी रोकड, कागदपत्रे उपलब्ध नसलेले दागिने असा एकूण १० कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यापैकी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ५ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकांनी जप्त केला. इचलकरंजी मतदारसंघात सर्वांत कमी १० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकांच्या हाती लागला.

Live Update : कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजप नेते करणार काँग्रेसची पोलखोल

कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजप नेते करणार काँग्रेसची पोलखोल

उद्या भाजपचे अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी आणि शोभा करलांजे यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील फसव्या घोषणांचा पर्दाफाश होणार असल्याचा दावा केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले खोटे दावे भाजप नेते खोडून काढणार असल्याची माहिती आहे. अनुराग ठाकूर, शोभा करलांजे,जी किशन रेड्डी, यांची सकाळी 11.00 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे

Live Update : आज होणाऱ्या महत्त्वाच्या सभा

आज होणाऱ्या महत्त्वाच्या सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 जाहीर सभा

चिमूर - दुपारी 12 वाजता 

सोलापूर-  दुपारी 2 वाजता 

पुणे -  दुपारी 4 वाजता  

अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर

घाटकोपर - सायं. 6 वाजता 

कांदिवली - सायं. 8 वाजता  

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 3 जाहीर सभा

अकोला - दुपारी 2 वाजता

अमरावती - दुपारी 3.30 वा 

नागपूर - संध्या 6 वाजता 

राहुल गांधी बुलढाणा दौऱ्यावर आहेत.गांधींच्या आज दोन सभा

चिखली  -  दुपारी 12 वाजता  

मेहकर - दुपारी 11 वाजता 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा

डहाणू - सकाळी 10.30 वाजता 

विक्रमगड  (जव्हार ) - दुपारी  12 वाजता  

पेण, जिल्हा रायगड - दुपारी (वेळ निश्चित नाही) 

सायन कोळीवाडा - सायं. (वेळ निश्चित नाही)

कल्याण - सायं. 6 वाजता 

नितीन  गडकरी यांच्या मराठवाड्यात 14 सभा    

देवणी, लातूर - सकाळी 10.50

निलंगा - सकाळी 11.20

किल्लारी - सकाळी 11.50

औसा - दुपारी 12.20

आंबेजोगाई - दुपारी 1 वाजता

केज -  दुपारी 1.40  वाजता

पाटोदा - दुपारी 2.30

आष्टी - दुपारी 3.15

अंबड - दुपारी 4.05

बदनापूर - दुपारी 4.50

नागपूर  दक्षिण पश्चिम - सायं. 7.05

पश्चिम दक्षिण - रात्री 8.00

मध्य नागपूर - रात्री 8.15

नाशिक - शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर.नाशिकमध्ये पवारांच्या 6 सभा

कळवण - सकाळी 10.30 वाजता

दिंडोरी - सकाळी 11.45 वाजता

निफाड - दुपारी 1 वाजता

येवला - दुपारी 3 वाजता

कोपरगाव - सायं. 5 वाजता

नाशिक पूर्व  - सायं. 7.30 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  जळगाव आणि अमरावती , वाशिम जिल्हा दौऱ्यावर

दर्यापूर , अमरावती -  सकाळी 11 वाजता

रिसोड, वाशिम- दुपारी 1 वाजता

एरंडोल, जळगाव-  सायं 4 वाजता

पाचोरा - सांय. 5.30 वाजता

धरणगाव - सांय. 7 वाजता

धाराशिव - उद्धव ठाकरेंच्या 2 सभा

उमरगा - दुपारी 2 वाजता

धाराशिव सायं.7 वाजता

विदर्भ - सुप्रिया सुळेंच्या 3 सभा

आलापल्ली - सकाळी 11 वाजता  

आर्वी - सायं.5 वाजता

माहीम - माहीम मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. आदित्य ठाकरे मनसे आणि सदा सरवणकर यांच्या बाबत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं. साय.6.30 वाजेपर्यंत

चांदीवली- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची चांदीवली मतदार संघात सभा पार पडणार आहे . मनसेचे उमेदवार महेश भानुषाली यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.सायं. 7.30 वाजता